आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashikal Aagashe Award Gose To Author Kavita Mahajan

कविता महाजन, स्वाती काटे, पृथ्वीराज तौर यांना आगाशे पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Kavita Mahajan - Divya Marathi
Kavita Mahajan

बुलढाणा- माजी मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी यंदा प्रसिद्ध लेखिका कविता महाजन (मुंबई) यांच्या ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहाची निवड झाली आहे. तसेच नांदेडच्या प्रा. स्वाती काटे, डॉ. पृथ्वीराज तौर यांनी संपादित केलेल्या ‘सृजनपंख’ या कवितासंग्रहाचीही निवड झाली आहे. 31 जानेवारी रोजी बुलडाण्यात कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.