आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार यांची चौकशी 25 वर्षांतही होणार नाही - अण्णा हजारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालयात खेचल्यास आमचे व या सरकारचे आयुष्य संपेल, तरी चौकशी पूर्ण होणार नाही. माझा या न्यायप्रक्रियेवर विश्वास असला, तरी हे राजकारणी लोक न्यायालयीन चौकशी प्रलंबित ठेवतील व निकालाला 20 ते 25 वर्षे लागतील, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
राळेगणसिद्धी येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत अण्णा म्हणाले, 14 मंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे पंतप्रधान कार्यालय व सरकार टीम अण्णावर देशद्रोही, विदेशी शक्तीचा हात असल्याचा आरोप करीत आहे. जनलोकपाल व काळा पैसा यावरून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा हा सरकारचा कुटिल डाव आहे.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी केलेल्या मागण्या सरकारला मान्य नाहीत. त्यामुळे 25 जुलैला आम्ही पूर्ण भारतभर आंदोलन उभे करणार आहोत. दिल्लीतील जंतरमंतर किंवा रामलीला मैदानावरून या आंदोलनाला दिशा दिली जाईल. पंतप्रधानांनी 26 मे रोजी मी पाठवलेल्या पत्राला उत्तर लिहिले आहे. मात्र, मला ते काही मिळालेले नाही. पत्रकारांना दिलेल्या प्रेसनोटमध्ये टीम अण्णा देशद्रोही असून टीमला विदेशी ताकद मिळत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. टीम अण्णाच्या सदस्यांना कोणत्या विदेशी राष्ट्राने मदत केली, त्याचे नाव जाहीर करावे किंवा चौकशी करून दोषींवर कठोर शिक्षा करावी. पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने असे निराधार वक्तव्य करून जनलोकपाल व काळा पैशावरील जनतेचे लक्ष विचलीत करू नये, असे अण्णांनी सुनावले आहे.
5 लाख खेड्यांत ग्रामसभा - जनलोकपाल व काळ्या पैशांसंदर्भात देशभरातील साडेपाच लाख खेड्यांत ग्रामसभा घेण्यात येईल. त्यातील ठरावांना सरकार नाकारणार का, असा सवाल अण्णांनी केला.
...तर पंतप्रधानांविरोधातही आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा
मनमोहन सिंग स्वच्छ प्रतिमेचे पंतप्रधान: अण्णा हजारे
यूपीए सरकार अस्थिर, वाजपेयींचा काळ बरा - शरद पवार