आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याला मिळाले सहा वीर चक्र,24 शौर्य पदके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरला लष्करीसेवेची उज्‍जवल परंपरा आहे. आतापर्यंत 52 जणांनी देशासाठी वीरमरण पत्करले आहे. जिल्ह्याचे भूमिपुत्र हवालदार नामदेव रंभाजी जाधव यांना ब्रिटिशकाळात व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला होता. सहाजणांना वीरचक्र मिळाले आहे. शौर्यपदक विजेत्यांची संख्या 24 आहे.

ब्रिटिश सैन्याच्या घोडदळाचे (कॅव्हलरी) मुख्यालय नगरला होते. त्याचे पुढे आर्र्मड कोअरमध्ये रूपांतर झाले. सध्या मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी), वाहन संशोधन व विकास आस्थापना (व्हीआरडीई), तसेच सीक्युएव्ही (क्वालिटी कंट्रोल अँश्युरन्स व्हेईकल) या लष्कराशी संबंधित संस्थांचे मुख्यालय येथे आहे.

जिल्ह्यातील 55 अधिकार्‍यांनी व 8 हजार 440 सैनिकांनी आपली सेवा पूर्ण करून निवृत्ती स्वीकारली. त्यातील 2061 निवृत्त सैनिक आता हयात नाहीत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण केंद्राचे प्रमुख कर्नल सुभाष रोखले यांनी दिली.

शौर्यपदक विजेते : हवालदार नामदेव रंभाजी जाधव- व्हिक्टोरिया क्रॉस (मरणोत्तर), नायक मच्छिंद्र रामभाऊ कडू- वीरचक्र, हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे- वीरचक्र, फ्लाईट लेफ्टनंट गोपाळ कृष्ण गरूड- वीरचक्र, कॅप्टन राजाभाऊ कुलकर्णी - वीरचक्र (मरणोत्तर), नायक एकनाथ महिपती कर्डिले- वीरचक्र (मरणोत्तर), हवालदार त्रिंबक दादा निमसे - शौर्यचक्र (मरणोत्तर), हवालदार किसन रामदास पवार- सेनामेडल, कर्नल एच. एस. पुरी (निवृत्त) सेनामेडल- विशिष्ट सेवा पदक, कॅप्टन र्शीकांत नागेश धर्माधिकारी- सेनामेडल, हवालदार गंगाधर बबन बेंडाळे- सेनामेडल, हवालदार रघुनाथ सोनाजी रोहकले - सेनामेडल, शिपाई बाळू नाना पगारे - सेनामेडल (मरणोत्तर), पेटी ऑफिसर अर्जुन माधव लोखंडे- नौसेनापदक, नायक मधुकर वामन शेरकर- सेनामेडल, नायक निवृत्ती यशवंत कोतवाल- सेनामेडल, एए-2 गोपाळ वसंत शिंदे- नौसेना पदक, शिपाई जगनाथ चांगदेव जाधव- सेनामेडल (मरणोत्तर), शिपाई संचिद्रा सावळाराम साके- सेनामेडल (मरणोत्तर), शिपाई प्रदीप शंकरराव भोसले- सेनामेडल (मरणोत्तर), शिपाई संजयकुमार कालीचंद वाकचौरे- सेनामेडल, सैपर बबन बळवंत कळमकर- विशेष नामोल्लेख, शिपाई मेघराज गणपती कोल्हे- सेनामेडल, लांसनायक मोहन रेवन्नाथ रौंदल- सेनामेडल, ले. कर्नल खुसरो गुस्ताद जलनावाला (निवृत्त)- विशिष्ट सेना पदक, एम मेजर जनरल (निवृत्त) अश्विनी कुमार दिवाण - अतिविशिष्ट सेवा पदक , वीरचक्र.


जिल्ह्याचा भूमिपुत्र मेजरजनरलपदी
नगर जिल्ह्यातील किमान 15 हजार जवान सध्या लष्करात सेवा बजावत आहेत. जिल्ह्याने लष्कराला पुरवलेल्या अधिकार्‍यांची संख्याही मोठी आहे. 55 अधिकारी निवृत्त झाले असले, तरी त्याहून अधिक सेवेत आहेत. त्यापैकी एक विजयकुमार केरू चव्हाण सध्या मेजर जनरल पदावर आहेत.