आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये रॅली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल मागणीसाठी दिल्ली येथे जंतरमंतरवर सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ शहरातील विद्यार्थी व नागरिकांनी रविवारी रॅली काढली.
अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी स्वयंसेवी संस्था, संघटनांचे कार्यकर्ते व अनाम प्रेमचे अंध विद्यार्थी यांच्यासह शेकडो नागरिक शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीतील चेतना रथावर अण्णांचा संदेश देणा-या पाट्या होत्या. स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी, डॉ. गिरीश कुलकर्णी, बालभवन प्रकल्पाचे व्यवस्थापक हनिफ शेख, मिलिंद चावरे, सागर भोसले, जमीर शेख, लुईस साळवे, मंगेश जोंधळे, यास्मिन शेख, नाना बारसे आदी या वेळी उपस्थित होते.
लालटाकी येथून निघोलेली रॅली तेली खुंट, चितळे रस्तामार्गे दिल्ली दरवाजा येथे गेली. तेथे रॅलीचा समारोप झाला. या वेळी विद्यार्थी व नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत जनलोकपाल मंजुरीची मागणी केली. मुलांनी ‘मै अण्णा हू’ असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. महिलांची संख्या लक्षणीय होती.
हनिफ शेख म्हणाले, अण्णांच्या समर्थनार्थ शहरातील झोपडपट्टी भागातील, तसेच अशिक्षित नागरिक पुढे आले आहेत. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अण्णांच्या जन्मगावी भिंगार येथेही जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. हजारे यांच्या आंदोलनाबाबत जनजागृतीसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
अण्णा आले, गर्दी वाढली: जंतरमंतरवर उपोषण सुरू

गर्दीची चिंता नको, शेवटपर्यंत लढणार - अण्णा