आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अ अमेरिका’चे प्रकाशन; महासत्ता बनण्याआधी अमेरिका समजून घ्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- अमेरिकेची लोकशाही आणि अर्थव्यवस्था याचे जगाला आकर्षण आहे. अमेरिकेचे हे स्थान मिळवण्याची संधी चीनप्रमाणे भारतालाही आहे. त्यासाठी आपल्याला आधी अमेरिका समजून घ्यावी लागेल, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी व्यक्त केले.
विजयकुमार महाजन यांच्या ‘अ अमेरिकेचा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी उद्योजक काकासाहेब चितळे, आभाळमाया फाउंडेशनचे प्रमोद चौगुले, प्रा. वैजनाथ महाजन उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, ‘अमेरिका सर्वच पातळ्यांवर प्रगत आहे. तेथील धोरणकर्ते हुशार आहेत. त्यांनी भारतीयांच्या बुद्धीचा अमेरिकेच्या प्रगतीसाठी चांगला उपयोग करून घेतला आहे. आज अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत झाली तर साºया जगाच्या अर्थव्यवस्थेत अडथळे निर्माण होतात. अमेरिकेच्या या स्थानाला शह देण्याचा प्रयोग चीन आणि जपानने हा प्रयोग करून पाहिला आहे, मात्र त्यांना यश आले नाही. भारताला ते शक्य आहे, कारण आपल्याकडे बौद्धिक अधिष्ठान आहे. आपल्या तरुणांकडे नवनिर्मितीची क्षमता आहे. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे,’ असे मोरे यांनी सांगितले.