आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ निवारण, शेती नुकसानभरपाईसाठी केंद्राने दिले 588 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - दुष्काळ निवारण, शेती व फळबाग नुकसानभरपाईसाठी केंद्राने राज्याला 588 कोटींच्या मदतीचे पॅकेज मंजूर केले आहे. वने, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी ही माहिती दिली. निधी मिळताच टंचाईग्रस्त 11 जिल्ह्यांतील शेतक-यांना सानुग्रह अनुदान वाटप होईल.चारा, पाण्याच्या उपायांसाठीही निधीचा वापर करू, असे कदम म्हणाले.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दुष्काळ पाहणीनंतर टंचाई नियोजनाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर केंद्रीय समितीने पाहणी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली होती. केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या दौ-यात केंद्राकडून भरीव मदतीचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने दुष्काळी भागासाठी ही मदत जाहीर केली आहे.
बागायतदारांना हेक्टरी 8, तर जिरायतदारांना 5 हजार - फळबागायतदारांना हेक्टरी 8, तर जिरायती शेतक-यांना 5 हजारांपर्यंत मदत करण्यात येणार आहे. फक्त दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत ही मदत असेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन खात्याच्या सुत्रांनी दिली.