आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णा, राजकारण नको, समाजकारणच बरे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलन उभे करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत एका मुलाखतीद्वारे दिले आहेत. अण्णांच्या या संकेतावरू न राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील अशा काही प्रातिनिधीक प्रतिक्रियांचा ‘दिव्य मराठी’ ने आढावा घेतला आहे.
आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अण्णा हजारे देशभरात दौरा करणार आहेत. तसेच लोकांमधून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवून त्यांच्यासाठी स्वत: प्रचार करणार आहेत, याबाबतचे संकेत त्यांनी एका मुलाखतीत दिले आहेत. परंतु, आजपर्यंत अण्णा हजारे यांनी प्रथमच भ्रष्टाचाराविरोधी जनआंदोलन उभे करून देशातला भ्रष्टाचार हद्दपार करण्याचा पवित्रा हाती घेतला आहे. भ्रष्टाचाराने होरपळणार्‍या जनतेनेही अण्णांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या आंदोलनात तरुणांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदवून अण्णा हजारे यांना पाठिंबा दिला. अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आणि देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी जनआंदोलन उभे केले. परंतु, अण्णा हजारे राजकारणात आल्यावर त्यांना लोकांचा कितपत पाठिंबा राहील, याबाबत उस्मानाबादेतील तरुणांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी अण्णांनी राजकारणात न येता सामाजिक क्षेत्रात राहूनच आपला लढा लढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अण्णा हजारे यांचे समाजकारणात जे वजन आहे, तेवढे राजकारणात राहणार नाही. तसेच राजकारणात जाऊन त्यांची प्रतिष्ठा कायम राहणार नाही. त्यापेक्षा अण्णांनी समाजकार्यातच राहून लोकांचे प्रश्न सोडवून पुढार्‍यांना कामाला लावावे. यासाठी लोकांतून त्यांना प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद राजकारणात मिळणार नाही.’’ रविंद्र कुलकर्णी.