आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- वाचक हासुद्धा लेखक असतो, तो साहित्यकृती मनात आकृतिबद्ध करीत असतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. निशिकांत ठकार यांनी व्यक्त केले. सोलापूरच्या समृद्ध वाड्मयीन संस्कृतीवर प्रकाश टाकणारे ‘प्रदेश सृजनांचा’ या डॉ. सुहास पुजारी लिखित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. या वेळी मंचावर बाबूराव मैंदर्गीकर, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा, लेखक डॉ. सुहास पुजारी उपस्थित होते.
डॉ. सुहास पुजारी यांनी लिहिलेल्या प्रदेश सृजनांच्या या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी डॉ. निर्मलकुमार फुडकुले सभागृहात प्रा. ठकार यांच्या हस्ते झाले. मुखपृष्ठकार शिरिष घाटे यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. या ग्रंथात 60 वर्षांच्या पुढील लेखकांचा समावेश असून, उपस्थित लेखकांचा सत्कार सुराणा यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रा. ठकार म्हणाले, की सोलापुरातील सारस्वतांचा परिचय देणारा संदर्भग्रंथ वाचकांच्या हाती येत आहे. विशेष म्हणजे वस्तुनिष्ठ लेखन झाले आहे. आगामी पुस्तकात नव तरुण साहित्यिकांचा समावेश असावा. साहित्याकडे तरुण आकर्षित झाले पाहिजेत असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात सुराणा यांनी शहरातील सांस्कृतिक करवट बदलताना दिसतोय, असे म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्नेहल पोतदार यांनी शारदा स्तवन सादर केले. बाबूराव मैंदर्गीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पद्माकर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.शरदकुमार एकबोटे यांनी आभार मानले.
39 लेखक, कवींच्या वाड्मयीन कार्याची ओळख
ग्रामदैवत सिद्धरामेश्वर, शुभराय महाराज, राम जोशी, वालचंद शहा, पंडित जीनशास्त्री फडकुले, महाकवी द. रा. बेंद्रे, कवी कुंजविहारी, कवी संजीव, मा. गो. काटकर, अमर शेख, वि. म. कुलकर्णी, त्र्यं. वि. सरदेशमुख, रा. ना. पवार, शाहीर विश्वासराव फाटे, प्रा. र्शीराम पुजारी, सुमेरचंद जैन, डॉ. निर्मलकुमार फडकुले, दा. का. थावरे, भगवानदास तिवारी, वसंत दिवाणजी, डॉ. गो. मा. पवार, मारुती चित्तमपल्ली, दत्ता हलसगीकर अशा 39 लेखक, कवींच्या वाड्मयीन कार्याची ओळख ग्रंथातून होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.