आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gordian Minister Laxman Dhobale At Solapur Dust Issue

कचर्‍यापासून वीज: प्रकल्पासाठी चारही दिशांना जागा घेण्याची सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: कचर्‍याच्या समस्येवर सकारात्मक रीतीने मात करण्यासाठी शहराच्या चारही दिशांना प्रत्येकी चार गुंठे जागेत वीजनिर्मिती आणि सेंद्रिय खताचा प्रकल्प उभारावा, अशी सूचना पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली. शासकीय विर्शामगृहात आयोजित महापालिका पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बैठकीत शहर विकासासंबंधी झालेल्या चर्चेत ते बोलत होते.
प्रक्रियायोग्य घनकचर्‍यापासून तीन विभागीय कार्यालयांकडून प्रायोगिक तत्त्वावर वीजनिर्मिती आणि सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उभारावेत. विविध ठिकाणच्या विहिरींचे अधिग्रहण करावे. गाळ काढून, पाण्याचे शुद्धीकरण करून संबंधित भागांमध्ये पुरवठा करावा, असेही ते म्हणाले. महापौर अलका राठोड, उपमहापौर हारून सय्यद, आयुक्त अजय सावरीकर, महेश कोठे आदी मान्यवर उपस्थित होते.