आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री अमृता यादवसह तीन युवक ताब्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात असलेल्या हिमाली या उच्चभ्रू लोकांच्या सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये असभ्य प्रकार होत असल्याच्या संशयावरून कोथरुड पोलिसांनी रविवारी रात्री अभिनेत्री अमृता यादव हिच्यासह तीन युवकांना ताब्यात घेतले. अमेय गोसावी, कौस्तुभ देशपांडे, अलोक जाधव यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, या सर्वांची चौकशी करून त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून संबंधितांना त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या फ्लॅटमध्ये कोणतेही गैरप्रकार होत नसून कौस्तुभच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी हे सगळे एकत्र जमले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलिसांकडून दडपले जात असल्याची चर्चा होती.