आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीला अश्लील एसएमएस पाठवणारा प्राध्यापक निलंबित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: गोरेगाव येथील पाटकर महाविद्यालयातील विद्यार्थिनीला अश्लिल एसएमएस पाठवल्याप्रकरणी याच महाविद्यालयातील ‘आयटी’ विषय शिकवणा-या राहुल सारांगले या प्राध्यापकाला बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. या प्राध्यापकाला निलंबित करावे या मागणीसाठी युवा सेना आणि मनसेतर्फे महाविद्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता.
युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, राहुल नावाच्या प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीला अश्लील एसएमएस पाठवला होता. या मुलीने धाडस दाखवून प्राध्यापकाविरोधात तक्रार नोंदवली. युवा सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना याची माहिती मिळताच त्यांनी प्राध्यापकाविरोधात आंदोलन करण्यास सांगितले, त्यानुसार आज आम्ही पाटकर महाविद्यालयावर मोर्चा नेला. मुलीचे वडीलही आमच्यासोबत होते. युवा सेनेबरोबरच मनसेनेही प्राध्यापकाविरोधात मोर्चा नेला होता.