आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • bjd and aidmk backs pa sangma candidature for president

राष्ट्रपती निवडणूक : बीजेडी, जयललितांचा संगमा यांना पाठिंबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाच्या नावाबाबत सध्या राजधानीत शांतता असली तरी या पदासाठी आणखी एक नाव पुढे आले आहे. हे नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. ए. संगमा यांचे. संगमा यांना बीजू जनता दल आणि जयललिता यांच्या एआयएडीएमकेचे समर्थन मिळाले आहे.
येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. यासाठी यूपीए व एनडीए यांच्याकडून अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा किंवा नाव पुढे केले गेले नाही. काँग्रेसकडून मात्र अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
१ सप्टेंबर १९४७ रोजी जन्मलेल्या पी. ए. संगमा हे केंद्रातील मोठे नेते राहिलेले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष तसेच मेघालयाचे मुखमंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे. १९९८मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. संगमा तब्बल आठवेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. सध्या ते मेघालयमधील वेस्ट गारो हिल्स या विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून कार्यरत आहेत.
दिल्लीत जाताच राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत शरद पवारांचे घूमजाव