आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'नरेंद्र मोदी हे सडलेले फळ, या गेंडयाला बाहेर फेका'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांनी राजकीय शिष्टाचार व पातळी सोडत विरोधकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी खालच्या पातळीवर टीका करताना त्यांना गेंडा संबोधले. तसेच मोदी म्हणजे नासलेले व सडलेले फळ आहे त्यामुळे त्या फळाला बाहेर फेकून दिले पाहिजे, अशी जळजळीत टीका केली आहे.
पटेल यांनी राजकोटमध्ये मोदी सरकारवर तुफान हल्ला चढविला. ते म्हणाले, सरकारमधील लोक सामान्य लोकांवर अन्याय करीत आहेत. महिला व मुले राज्यात सुरक्षित नाहीत. त्याचे सरकारला काहीही सोयरसुतक नाही. तसेच त्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जाते. मोदी हे असंवेदनशील नेते असून त्यांनी गेंड्याचे रुप धारण केले आहे. त्यामुळे त्यांना सत्तेतून नासक्या फळाप्रमाणे बाहेर फेकले गेले पाहिजे, असे पटेल यांनी मोदींवर हल्ला चढविला.
अभिनेत्रीबरोबर नरेंद्र मोदींची सेक्स सीडी?