आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देणार राहुलला टक्कर - टाईम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भलेही अमेरिकेचा व्हिजा मिळाला नसेल मात्र अमेरिकेला मोदींच्या नेतृत्व कौशल्यावर आणि राजकारणाबद्दल जराही शंका नाही. अमेरिकेतील प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय नियतकालिक टाईमच्या आशिया खंडातील आवृत्तीच्या मुखपृष्ठावर मोदींना स्थान दिले गेले आहे. तसेच मोदी यांच्यावरील प्रमुख लेखामध्ये आगामी लोकसभा निवडणूकीत गुजरातचे मुख्यमंत्री मोदी हेच काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना टक्कर देऊ शकतात असे म्हटले आहे.
'टाईम'च्या मुखपृष्ठावर मोदींचे छायाचित्र आहे. नियतकालिकाने मोदींच्या स्तुतीत 'बॉय फ्रॉम द बॅकयार्ड' या शिर्षकाचा लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात मोदी म्हणजेच काम असेही लिहीले आहे. तसेच मोदी भारताचे नेतृत्व करु शकतात का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
मुखपृष्ठ कथेत टाईमने मोदी आणि राहुल यांच्यातील संभाव्य लढतीबद्दल लिहीले आहे की, ६१ वर्षीय मोदीच असे आहेत की जे राहुल गांधींच्या विरोधात उभे राहू शकतात. कारण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड इतरांपेक्षा अधिक भक्कम आहे.
अनेक जण त्यांचे नाव २००२ मधील गुजरात दंगलीशी जोडतात, मात्र असेही लोक आहेत ज्यांना विश्वास आहे की, देशाला भुख, भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेतून मोदीच बाहेर काढु शकतात. अशा लोकांचे म्हणणे आहे की, असाच दृढ निश्चयी नेता देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेऊ शकतो. ज्यामुळे भारत चीन सारख्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल.
तसेच 'टाईम'ने मोदींना एक वादग्रस्त, महत्वाकांक्षी आणि धुर्त राजकारणी देखील म्हटले आहे. त्यांच्या सदभावना उपवासांचा देखील यात उल्लेख करण्यात आला आहे. हे मोदींचे बदललेले रुप असून आत्मशुद्धी, नम्रता आणि राज्यातील लोकांशी संपर्काचे मध्यम असल्याचे म्हटले आहे.
या नियतकालिकाने मोदी आणि राहुल यांची तुलना केली आहे. राहुलबद्दल लिहिले आहे की, आगामी लोकसभा निवडणूकीला केवळ दोन वर्ष उरले आहेत. काँग्रेला विश्वास आहे की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल आणि काँग्रेसचे नेते पक्षात नवी चेतना निर्माण करु शकतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांची जादू चालली नाही हेच स्पष्ट होत आहे.
नरेंद्र मोदीच 2014मध्ये भाजपचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार
दंगल रोखण्यात अपयश; मोदी सरकारवर ठपका
वावटळीत राहुल; चक्रीवादळात काँग्रेस! (अग्रलेख )
पंतप्रधान होण्याचा विचार नाही : राहुल गांधी