आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Mumbai Attack To Hafiz Saeed With Abu Hamaza Seating At Karachi Control Room

26/11 च्या हल्ल्यावेळी जबीउद्दीनसोबत होता हाफिज सईद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यावेळी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू हमजा याच्या सोबत लष्कर-ए- तैयबाचा मोरक्या हाफिज सईद हा देखील कराचीतील कंट्रोल रूममध्ये होता. तेथे बसून हे दोघे अजमल कसाबसह अन्य दहशतवाद्यांना मार्गदर्शन करत असल्याची धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे. मुंबई हल्ल्याच्या दोन दिवस अगोदर अबू जिंदालने फैयाज कागझीसोबत पाकिस्तानातील बैतुल्ला मुजाहिद्दीन भागात मॉकड्रीलही केल्याचे उघड झाले आहे.
दिल्ली पोलिसांनी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदाल उर्फ अबू हमजा याला आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर अटक केली. जिंदालला अटक ही दिल्ली पोलिसांची मोठी कामगिरी असल्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी सांगितले.
दहशतवादी अजमल कसाबसह अन्य दहशवाद्यांना हिंदी शिकविण्याची जबाबदारी अबू जिंदालवर सोपविण्यात आली होती. पुण्यातील जर्मन बेकरी ब्लास्टसह अहमदाबाद स्फोटात जिंदालचा हात होता, अशी माहिती चिदंबरम यांनी दिली. तसेच दिल्ली पोलिस आणि महाराष्‍ट्र एटीएसमध्ये कोणतेही वाद नसल्याचे त्यांची यावेळी स्पष्ट केले.
कसाब झाला अस्वस्थ
लष्कर-ए- तैयबाशी संबंधित दहशतवादी अबू हमजाच्या अटकेचे वृत्त ऐकून 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब अस्वस्थ झाला. जिंदाल यांने कसाबला हिंदी भाषा शिकवली होती.
जिंदालला अटकेचे वृत्त कसाबला कळले तेव्हा तो अस्वस्थ झाला. परंतु थोड्याच वेळात त्याने त्याच्याबद्दल माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली, अशी माहिती तुरुंगाच्या सुत्रांनी दिली. अबूला कुठे अटक करण्यात आली. तो एकटा होता की, आणखी कोणी त्याच्यासोबत होते. त्याला मुंबईला आणले जाणार आहे काय? अशी एकापाठोपाठ एक प्रश्न विचारायला त्याने सुरुवात केली.
मालेगाव ब्लास्टमध्ये जबीउद्दीनचा हात; हिंदूवादी संघटनेचा आरोप
'अटकेतील अबू जिंदाल माझा मुलगा नाही, जबीउद्दीन दहशतवादी असू शकत नाही'
9/11 सारख्या हल्ल्याच्या तयारीत होता अबू हमजा
चोराच्या उलट्या बोंबा: अबू हमजा आणि पाकिस्‍तानचा काही संबंध नाही- मलिक