आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Safely Took Gujrati Tourists From Utterakhand

उत्तराखंडमधुन 15 हजार गुजराती पर्यटकांना मोदींनी सुखरूप घरी पोहोचविले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून/नवी दिल्‍ली- गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर कडाडून हल्‍ला चढविला. तसेच उत्तराखंडमध्‍ये परिस्थिती भीषण असून संपूर्ण देश उत्तराखंडच्‍या जनतेच्‍या पाठीशी असल्‍याचे सांगून मोदींनी दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न केला. भाजपच्‍या निवडणूक प्रचार समितीचे अध्‍यक्ष झाल्‍यानंतर नरेंद्र मोदींनी पंजाबमध्‍ये पठाणकोट येथे पहिली रॅली काढली. मोदींनी उत्तराखंडमध्‍ये जाऊन तिथे अडकलेल्‍या 15 हजार गुजराती यात्रेकरुंना राज्‍या सुरक्षितपणे परत पाठविले. मोदींनी कोणताही गाजावाजा न करता ही मोहिम फत्ते केली.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मोदी काल सायंकाळी उत्तराखंडमध्‍ये पोहोचले होते. त्‍यांच्‍या दौ-यावरुन कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांनी टीका केली होती. परंतु, मोदीं शांतपणे कोणतीही व्‍हीआयपी ट्रीटमेंट न घेता आयएस, आयपीएस, आयएफएस आणि गुजरात लोकसेवा आयोगाच्‍या अधिका-यांना घेऊन उत्तराखंडमध्‍ये दाखल झाले. या पथकाने गुजराती यात्रेकरुंना परत पाठविण्‍याची योजना आखली होती. त्‍यानुसार, 80 टोयोटा इनोव्‍हा गाड्यांसह 25 लक्‍झरी बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. त्‍यातून यात्रेकरुंना दिल्‍ली पोहोचविण्‍यात आले. तिथून चार विमानांमधून यात्रेकरुंना गुजरातमध्‍ये नेण्‍यात आले. मोदींनी बचाव कार्यात मदतीचा हातही पुढे केला असून अडचणींवर मात कशी करता येईल, याबाबत सुचनाही केल्‍या आहेत.

पुढे वाचा... मोदींचा कॉंग्रेसवर हल्‍लाबोल...