आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक भंवरी, अन् भोव-यात फिरताहेत दहा कुटुंब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - बिलाडा भागातील परिचारिका भंवरी देवी ही जोधपूर जिल्ह्यातील दहा कुटुंबांचे वाटोळे होण्यास कारणीभूत ठरली आहे. भंवरीचे अपहरण आणि तिच्या हत्येच्या आगीत मारवाडमधील दोन दिग्गज राजकीय परिवार होरपळून निघाले आहेत. एकीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते परसराम मदेरणा यांचा मुलगा महिपाल मदेरणा यांना मंत्रिपद गमवावे लागले आहे तर दुसरीकडे दिग्गज काँग्रेसी नेते स्व. रामसिंह बिष्णोई यांची दोन मुले आमदार मलखान सिंह आणि परसराम हेही या प्रकरणात अडकले आहेत.
मुलगी इंद्रा बिष्णोई ही दीड महिन्यांपासून फरार आहे. याच मालिकेत कॉंग्रेसचे माजी उपजिल्हा प्रमुख साहिराम बिष्णोईसुद्धा कट रचल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला आहे. भंवरी आणि मदेरणा यांच्यात मध्यस्थी करणारा ठाणेदार लाखाराम यालाही झळ पोहोचली आहे. त्याला आता निलंबित करण्यात आले आहे.
मदेरणा, बिष्णोई, सहीराम, इंद्रा, भंवरी यांच्याशी संबंधित १० कुटुंबांचे भंवरी प्रकरणात वाटोळे झाले आहे.
कालव्यात आढळले भंवरीचे दात, घड्याळ, लॉकेट अन् ...
छायाचित्रांतून पाहा - भंवरी देवी प्रकरणाच्या तपासाची एक झलक
भंवरी देवीला जाळण्यास लाकडे पूरविणारे आणखी दोघे अटकेत
आमदाराच्या बहिणीने घडवून आणली भंवरी देवीची हत्या
मदेरणाच्या फार्महाऊसवर भेटायचे मलखान आणि भंवरी