आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Appears Before Par Panel, Pitches For Generic Medicines

जेनेरिक औषधींसाठी आमिर खानची संसद वारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सत्यमेव जयते या मालिकेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा अभिनेता आमिर खान याने गुरुवारी जेनेरिक औषधीचा मुद्दा संसदीय समितीसमोर उपस्थित केला. या स्वस्त गोळ्या कंपन्यांनी गरिबांना उपलब्ध करून दिल्यानंतरही त्यांना नफा कमवता येऊ शकतो, असे त्याने म्हटले आहे.
टीव्हीवरील सत्यमेव जयते या कार्यक्रमातून 47 वर्षीय खानने वैद्यकीय व्यवसाय व औषध उद्योगातील गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. गुरुवारी तो एक साक्षीदार म्हणून समितीसमोर जाबजबाबासाठी हजर झाला होता. ही समिती थेट परदेशी गुंतवणुकीसह अनेक मुद्यांचा आढावा घेण्याचे काम करत आहे.
फार्मा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावर समिती काम करत आहे. फार्मा क्षेत्रात अशा प्रकारच्या गुंतवणुकीला परवानगी देताना छोट्या कंपन्यांचे हिताचे रक्षण व्हायला हवे, असे मत आमिरने व्यक्त केल्याचे समितीच्या सदस्यांनी बैठकीनंतर सांगितले. अशा जेनेरिक औषधांच्या गुणवत्ता व शक्तीवर शंका उपस्थित केली जाते. परंतु हा आरोप केवळ त्यांच्या स्वार्थातून आलेला असतो. परंतु गरिबांना औषधी कशी मिळेल, हा येथे मुद्दा आहे. त्यांना फायदा कसा होईल, असे आमिरने संसदीय समितीसमोर सांगितले.
अभ्यासानंतरच आरोप
कोणत्याही डॉक्टरांवर मला वैयक्तिक आरोप करायचे नाहीत. तसा उद्देश नाही. परंतु जे आरोप मी केले आहेत. त्याला संशोधनाचा आधार आहे. संशोधन, अभ्यास केल्यानंतरच आपण हे आरोप केले आहेत, असे आमिर खानने स्पष्ट केले आहे. वैद्यकीय व्यवसायावरील भाग टीव्हीवरून झळकल्यानंतर डॉक्टरांनी आमिरला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हे आरोप कोणत्या आधारे केले, असा सवाल डॉक्टरी पेशातील संघटनांनी केला होता.
स्टार्सची जनजागृती
चित्रपटात जर सिगारेट पिण्याचे दृश्य असेल तर तो अभिनेताच आता चित्रपट सुरू होण्या अगोदर सिगारेटच्या हानीची माहिती देणार आहे. तसे आदेश सेन्सॉर बोर्डाने सर्व चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत. जो कलाकार सिगारेट पित असेल त्याच्याच आवाजात हानीची माहिती चित्रपट सुरू होण्या अगोदर व मध्यंतरापूर्वी ऐकवण्यात येईल.
सत्यमेव जयते : आमिरने नाही, डॉक्टरांनीच माफी मागावी - वाचकांचाही सूर
बोल इंडिया बोल: सत्यमेव जयते, डॉक्टरांनी माफी मागावी की आमिरने?