आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खान राज्यसभेत खासदारांसमोर करणार डॉक्टरांचे 'पोस्टमार्टम'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 'सत्यमेव जयते'च्या माध्यमातून देशातील अपप्रवृत्तींची पोलखोल करणारा अभिनेता आमिर खान आता संसदेच्या खासदारांसमोर डॉक्टरांचे 'पोस्टमार्टम' करणार आहे.
आमिरने 'सत्यमेव जयते'च्या पहिल्या भागात डॉक्टरांची अशी बाजू उजेडात आणली की, ज्यांचे काम जीवदान देण्याचे आहे ते काही किरकोळ रकमेसाठी मुलींचा गर्भातच गळा घोटतात. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर त्याने प्रकाश टाकला.
याच विषयाला धरुन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात भाषण देण्यासाठी आमिरला निमंत्रण देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार शांता कुमार यांनी दिलेले निमंत्रण आमिरने स्विकारले असून गुरुवारी तो राज्यसभेत वैद्यकीय क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूकीवर बोलणार आहे.
'सत्यमेव जयते' या कार्यक्रमामुळे आमिरला संसदेचा सदस्य नसतांनाही वरिष्ठ सभागृहात भाषण करण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमातून त्याने आतापर्यंत स्त्रीभ्रूण हत्या, बाल लैंगिक शोषण यासारख्या संवेदनशिल विषयांवर चर्चा घडवून आणली आहे.
सत्यमेव जयते : आमिरने ओळख करून दिली 'रियल हिरोज्'ची
सत्यमेव जयते : आमिरने नाही, डॉक्टरांनीच माफी मागावी - वाचकांचाही सूर
'सत्यमेव जयते'वर भडकले डॉक्टर्स, आमिरने आमची माफी मागावी
सत्यमेव जयते : बाल शोषणाच्या तक्रारींचा पाऊस
सत्यमेव जयते: आमिरची ब्रँड इमेज होणार आणखी मजबूत