आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला हवा असलेला अबू हमजा जिवंत नाहीः जबिउद्दीनचा खुलासा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः भारताला हवा असलेला कुख्‍यात दहशतवादी 'अबू हमजा' जिवंत नाही, असा खुलासा अबू जुंदल उर्फ जबिउद्दीन अन्‍सारीने केला आहे.
भारतात झालेल्‍या अनेक दहशतवादी हल्‍ल्‍यांमध्‍ये अबू हमजा याचा हात होता. त्‍यात बंगळुरुतील भारतीय विज्ञान संस्‍थेवर झालेला हल्‍लाही हमजाने घडवून आणला होता. अबू जुंदलला ज्‍यावेळी अटक झाली तेव्‍हा तोच हा अबू हमजा आहे, अशी माहिती येऊ लागली होती. परंतु, भारताला हवा असलेला अबू हमजा हा नव्‍हे, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले. आता जबिउद्दीनने अबू हमजा हा जिवंत नसल्‍याची माहिती दिली आहे. दिल्‍ली पोलिसांना चौकशीदरम्‍यान माहिती देताना त्‍याने सांगितले की, 2009 मध्‍ये हमजाचा मृत्‍यू एका गूढ आजारामुळे झाला. मोहम्‍मद रमादान मोहम्‍मद सिद्दीकी, असे अबू हमजाचे खरे नाव आहे. त्‍याच्‍या अंत्‍यविधीला मी उपस्थित होतो, असे जबिने सांगितले. जबिउद्दीनने लष्‍कर-ए-तैय्यबा या दशहवादी संघटनेची सखोल माहिती दिल्‍याचा दावा दिल्‍ली पोलियांनी केला आहे. मुंबई दहशतवादी हल्‍ल्‍यावेळी कराची येथील नियंत्रण कक्षातून दहशतवाद्यांना सूचना देण्‍यात येत होत्‍या. सूचना देणा-यापैकी एकाचा आवाज अबू हमजाचा होता, असा दावा महाराष्‍ट्र एटीएसने केला होता. हल्‍लेखोरांना हमजानेच शस्‍त्रास्‍त्रांचे प्रशिक्षण दिले, असेही एटीएसने म्‍हटले आहे. जबिने मात्र हा दावा फेटाळला आहे.
मटण, बिर्याणी आणि मोगलाई लज्‍जतः जबिचा कसाबपेक्षाही शाही पाहूणचार
जबिने नेपाळमध्‍ये लष्‍करच्‍या दहशतवादी शिबिरात घेतले प्रशिक्षण
पाकिस्तानी ISIच्या मेजरने पुरविली होती कसाबला एके-47 ची काडतुसे