आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टमार्टम रिपोर्ट: गीतिकासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध झाल्याचे उघड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/गुडगाव- एअरहोस्टेस गीतिका शर्मा आत्महत्ये प्रकरणातील अनेक खुलासे समोर येत आहेत. गीतिकाचे अनेक वेळा अनैसर्गिक लैंगिक शोषण झालेल्याची माहिती तिच्या शवविच्छेदन अहवालामध्ये उघड झाली आहे. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. गीतिकाच्या शवविच्छेदन अहवालामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
आरोपी आणि हरियाणाचे गृहमंत्री गोपाल कांडा हा बेशरम व्यक्ती असून त्याची प्रत्येक मुलीवर वाईट नजर असते, असे गीतिकाने मृत्यूपूर्व लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहून ठेवले होते.
मृत गीतिकाचे शवविच्छेदन दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये 6 ऑगस्टला करण्यात आले होते. अहवालानुसार गीतिकाच्या मृत्यूसोबत अनेक महत्त्वाचीही माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मागील बर्‍याच काळापासून गीतिकासोबत लैंगिक संबंध झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध झाल्याचाही खुलासा डॉक्‍टरांनी केला आहे.
गीतिकाचा गर्भपात करण्यात आल्याचेही अरुणा चढ्‍ढाने पोलिसांना दिलेल्या जबाबत सांगितले होते. चढ्ढा हिने गितिकाचा गर्भपात कोठे केला त्या ठिकाणांचा शोध घेण्यात येत आहे.
अटकेतील अरुणा चढ्ढा ही एमडीएलआर एअरलाइन्स कंपनीची माजी एमडी आहे. गितिकाने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांच्यासोबतच तिच्यावरही आरोप केला होता. पोलिसांनी तिच्या कोठडीची मागणी करताना युक्तिवाद केला की, गितिकाचा एक इ-मेल हाती लागला आहे. तो तिने चढ्ढाला पाठवला होता. यात गितिकाने म्हटले होते की, ती करियर करू इच्छिते आणि त्यात कोणी आडकाठी आणू शकत नाही. इ-मेलच्या पडताळणीसाठी चढ्ढाची चौकशी करण्याची गरज आहे. त्याचवेळी चढ्ढाच्या वकिलांनी पोलिस कोठडीस विरोध केला. अरुणाला 8 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.
गीतिका आत्महत्या प्रकरण: अटकपूर्व जामीनसाठी गोपाल कांडा हायकोर्टात
परीक्षा हॉलमध्ये बसून गीतिकावर लक्ष ठेवायचा गोपाल कांडा!
गीतिकाचा गर्भपात केल्याचे उघडकीस