आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Host es Geetika Sharma Suicide Case Gopal Kanda In High Court

गीतिका आत्महत्या प्रकरण: अटकपूर्व जामीनसाठी गोपाल कांडा हायकोर्टात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एमडीएलआर कंपनीची माजी एअरहोस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी हरियाणाचे माजी गृह राज्य मंत्री गोपाल कांडांनी सोमवारी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली.
या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी दिल्ली सत्र कोर्टाने कांडाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. कांडा गेल्या सहा दिवसांपासून फरार आहे. पोलिस दिल्ली, हरियाणा, सिलीगुड़ी स्थित कांडाच्या बंगल्यांवर छापेमारी केली होती. परंतु कांडाचा सुगावा लागला नाही. परंतु, काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि सीडीज् पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. तसेच कांडाने गीतिकाला पाठवलेल्या 400 एसएमएसची चौकशीही पोलिस करत आहेत. कांडावर गीतिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
गीतिकाने उत्तर दिल्लीतील अशोक विहारमध्ये पांच ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. गीतिकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये कांडाला जबाबदार धरले होते.
पोस्टमार्टम रिपोर्ट: गीतिकासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध झाल्याचे उघड