आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून अण्णा हजारेंचे उपोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा केंद्र सरकराला आव्हान दिले आहे. मजबूत लोकपालसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे त्यांनी उपोषण सुरु केले आहे. त्याआधी ते म्हणाले, जन लोकपाल पारित होत नाही तोपर्यंत सरकारशी कोणतीही चर्चा होणार नाही. अण्णांच्या आधीपासून उपोषणाला बसलेले अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि गोपाल रॉय यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
उपोषणाला सुरुवात करण्याआधी जंतर-मंतरवर जनतेशी संवाद साधताना अण्णा म्हणाले, आज कोणा समोर देशाचे भविष्य बदलण्याचे लक्ष्य आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रामध्येच राजकीय पक्ष फिरत आहेत. सत्ता केवळ दिल्ली- मुंबई मध्ये केंद्रीत झाली आहे. ती जनतेच्या हातात नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. लोकपालतर मिळवणारचे आहोत त्यासोबतच, समग्र परिवर्तन हे आमचे ध्येय आहे. लोकपाल आल्यानंतर ६० ते ६५ टक्के भ्रष्टाचार कमी होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
जंतर-मंतरवर आज लोकांनी मोठी गर्दी केली आहे. जवळपास ५ ते ६ हजार लोक येथे उपस्थित आहेत.
शनिवारपर्यंत टीम अण्णाच्या उपोषणाची दखल न घेणारे केंद्र सरकार आज जरा हलले आहे. केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आव्हान देणे हे एखाद्या हत्तीला टक्कर देण्यासारखे आहे.
खुर्शीद केजरीवाल यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत होते, ज्यात केजरीवाल म्हणाले होते की, डेहरादूनमध्ये अण्णांच्या रॅलीला स्थानिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता तर, त्याच वेळी जवळच राहूल गांधी यांच्या कार्यक्रमात नावालाही गर्दी नव्हती.
खुर्शीद म्हणाले, ज्या प्रकारच्या लोकपालची मागणी टीम अण्णा करत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेलाच त्रास होणार आहे.
गर्दीची चिंता नको, शेवटपर्यंत लढणार - अण्णा
अण्णा समर्थकांची पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शने
अण्णा राजकारणात! जनतेतून उमेदवार निवडणार
अरविंद, किरण, रामदेव यांनी निवडणूक लढवली तर माझा पाठिंबा- अण्णा हजारे
अण्णा-बाबांचे क्रांतिदिनी रणशिंग; 9 ऑगस्टला दिल्लीत करणार आंदोलन
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा पाठिंबा
सलमान खुर्शीद यांची 'गुप्त' भेट घेतली का? पत्रकारांच्या प्रश्नावर भडकले अण्णा