आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा राजकारणात!अण्णा राजकारणात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भ्रष्टाचाराविरुद्ध जनांदोलन उभे करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता थेट निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. तसे संकेत त्यांनी गुरुवारी एका मुलाखतीत दिले आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणा-यांना कायम पाठिंबा राहील. मात्र, तो स्वार्थी निघाला तर त्यांची संगत कायम सोडू, असा इशाराही त्यांनी शुक्रवारी दिला.
2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आपण देशभर दौरा करणार असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. लोकांमधूनच उमेदवार ठरवले जातील. यातून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवून त्यांच्यासाठी स्वत: प्रचार करू, असे अण्णा म्हणाले.
रामलीला मैदानावर शुक्रवारी माध्यमांशी बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, राष्ट्र पती हे घटनात्मक पद आहे. अशा पदावरील व्यक्तीवर कोणीही टीका करायला नको. अण्णांचीही या मताला सहमती आहे. याआधीच अण्णांनी प्रणव मुखर्जी यांच्यावर कोणतीही टीका न करता त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
उपोषण सुरू करताना केजरीवाल यांनी 25 जुलै रोजी म्हटले होते की, देशात लोकपाल असता तर प्रणव मुखर्जी कधीही राष्ट्र पती होऊ शकले नसते. रामदेवबाबा येत्या 9 ऑगस्टपासून काळ्या पैशाविरुद्ध आंदोलन करणार आहेत.
माध्यमांना रोखले - उपोषणस्थळी लोकांची संख्या सातत्याने घटत आहे. शुक्रवारी अण्णा बोलण्यासाठी उभे ठाकले तेव्हा तेथे जवळपास 300 लोक होते. माध्यमांना कव्हरेज करण्यासही रोखण्यात आले. याउपर माध्यमांनी जंतर-मंतर मैदानावर व्यासपीठासमोर आंदोलकांविना रिकामी पडलेली जागा दिवसभर दाखवली. आयोजकांनी मात्र यामागे बाहेरच्या शक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे. सशक्त लोकपालखेरीज प्रणवसह केंद्रीय मंत्र्यांवरील आरोपांची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची टीम अण्णाची मागणी आहे.
‘अंडरप्ले’चे आदेश : बेदी - यूपीए सरकारने मीडियाला आंदोलन अंडरप्ले करण्यास सांगितले आहे, असा आरोप किरण बेदी यांनी केला आहे. यासाठी सरकारने स्पष्ट पत्रच पाठवले आहे, असे बेदी म्हणाल्या.
मस्करी सुरू आहे : काँग्रेस - टीम अण्णाने भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या नावाखाली आता मस्करी चालवली असल्याची टीका काँग्रेसने केली. सर्वसामान्यांच्या धरणे धरण्याच्या अधिकाराची रामदेवबाबा आणि टीम अण्णाने खिल्ली उडवली असल्याचे प्रवक्ते रशीद अल्वी म्हणाले.
राष्ट्र पतींवर टीका चुकीची : रामदेवबाबा - टीम अण्णाच्या सदस्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर केलेली टीका योगगुरू रामदेवबाबांनी अयोग्य ठरवली आहे. जवळपास 2 हजार समर्थकांसह बाबा शुक्रवारी रामलीला मैदानातून मार्च करत टीम अण्णाचे उपोषण सुरू असलेल्या जंतरमंतरवर पोहोचले. टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल, मनीष शिसोदिया, गोपाल राय उपोषणाला बसले आहेत.
अरविंद, किरण, रामदेव यांनी निवडणूक लढवली तर माझा पाठिंबा- अण्णा हजारे
अण्णा-बाबांचे क्रांतिदिनी रणशिंग; 9 ऑगस्टला दिल्लीत करणार आंदोलन
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा पाठिंबा