आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णा आले, गर्दी वाढली: जंतरमंतरवर उपोषण सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जनलोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले. आपली तब्येत आता साथ देत नसली तरी शेवटच्या श्वासापर्यंत भ्रष्टाचार मिटवण्यासाठी लढत राहू, असा निर्धार अण्णांनी व्यक्त केला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून जंतर-मंतरकडे पाठ फिरवणा-या लोकांनी अण्णा मैदानात उतरताच रविवारी प्रचंड गर्दी केली. दिवसभर तिरंगी झेंडे आणि घोषणाबाजीने मैदान दुमदुमून गेले.
टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि गोपाल रॉय यांनी पाच दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले. मात्र अपेक्षित गर्दी जमली नाही. अण्णांनी या उपोषणात सहभागी होऊ नये, अशी टीम अण्णाची इच्छा होती. प्रकृतीच्या तक्रारी पाहता यंदा अण्णांनी उपोषणापासून दूरच राहावे, असे या सदस्यांनी सांगितले होते. मात्र अण्णा सकाळी साडेदहा वाजता आंदोलनात उतरले. उपोषण सुरू करताना अण्णा म्हणाले, ‘प्रकृतीच्या तक्रारी पाहता माझ्या टीमने उपोषण करण्यास मनाई केली होती. मात्र, जे लोक उपोषण करत आहेत त्यांच्याकडे मी दुर्लक्ष कसा करू शकेन? जोवर जनलोकपाल मिळत नाही तोवर जनता मला मरू देणार नाही.’ आमीर खान, माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह, नारायणमूर्ती, अमिताभ बच्चन, माजी राष्टÑपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अण्णांनी केले.

पंतप्रधानांच्या घराबाहेर निदर्शने: अण्णांनी मागितली माफी
शनिवारी पंतपधानांच्या निवासस्थानाबाहेर काही अण्णा समर्थकांनी निदर्शने केली. याबद्दल अण्णांनी माफी मागितली. कोळसा फेकण्याचा तसेच भिंतींवर आक्षेपार्ह घोषणा रंगवण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे ते म्हणाले. असे घडले असेल तर आपण माफी मागू इच्छितो, असे अण्णा म्हणाले. हा जनतेच्या मनातील राग आहे. हे लोक कुठवर सहन करतील? असेही ते म्हणाले.

रामदेव-मोदींबाबत टीम अण्णा नाखुश
रामदेवबाबा आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर आल्याबद्दल टीम अण्णाचे काही सदस्य नाराज आहेत. संजय सिंह म्हणाले, ज्या राज्यात 9 वर्षांपासून लोकायुक्त नेमला जात नाही त्या मुख्यमंत्र्यांचे समर्थन करताच येणार नाही.
चेन्नईमध्ये 70 समर्थक अटकेत
चेन्नई : केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरासमोर निदर्शने करणाºया 70 अण्णा समर्थकांना पोलिसांनी अटक केली. चिदंबरम यांच्यासह 15 मंत्र्यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी करत हे लोक जोरदार घोषणाबाजी करत होते.

‘किडनी फेल’चा इशारा
गेल्या 27 डिसेंबरला अण्णांनी मुंबईत 3 दिवसांचे उपोषण सुरू केले. मात्र, 28 डिसेंबरलाच त्यांनी उपोषण मागे घेतले. किडनी निकामी होण्याचा धोका असल्याचे डॉक्टरांनी त्यांना बजावले होते.
राहुल-सोनियांशी टक्कर म्हणजे हत्तीला धडक मारण्यासारखे - खुर्शीद
टीम अण्‍णाची राष्‍ट्रपतींवर टीका चुकीचीः रामदेव बाबांची विरुद्ध भूमिका
अरविंद, किरण, रामदेव यांनी निवडणूक लढवली तर माझा पाठिंबा- अण्णा हजारे