आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषणाचा मार्ग सोडून... अण्णा राजकारणात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकारणात येण्याचे संकेत गुरुवारी दिले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारणा-या अण्णांनी ‘केंद्र सरकार लोकपाल आणणार नाही, त्यामुळे मलाच आता राजकीय पर्याय द्यावा लागेल,’ असे स्पष्ट केले. अर्थात ते स्वत: निवडणूक लढवणार नाहीत, पण प्रामाणिक लोकांना राजकारणात आणतील. लोकांकडून त्यांनी दोन दिवसांत अभिप्राय मागितला आहे. शिवाय शुक्रवारी टीम उपोषण सोडणार असल्याचेही अण्णांनी जाहीर केले.
माहिती-प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी अण्णांची नियत उघड झाली. राजकीय महत्त्वाकांक्षेपायीच ते लोक काम करत होते, असे म्हटले आहे. तर भाजपसह इतर पक्षांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. फेसबुक, ट्विटरसारख्या साइट्सवरून लोकांनी अण्णांना पाठिंबा जाहीर केला. रामदेवबाबा मात्र गप्प आहेत. टीममधील मेधा पाटकर यांनी हे पाऊल आत्मघाती ठरेल, असे म्हटले आहे.
सरकार अहंकारी : अनुपम खेर
सरकारकडून कोणताही प्रस्ताव न येणे लाजिरवाणे आहे, असे अभिनेते अनुपम खेर म्हणाले. उपोषणार्थीच्या प्रकृतीची चौकशीही न करणारे सरकार अहंकारी आहे, असे ते म्हणाले.
23 व्यक्तींनी सोडवले उपोषण
माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह, माजी सरन्यायाधीश कृष्ण अय्यर, माजी नौदलप्रमुख राम तहलियानी, माजी निवडणूक आयुक्त लिंगडोह, पत्रकार कुलदीप नय्यर व अनुपम खेर.

यासाठी सोडले उपोषण...

०आतापर्यंत पाठिंबा देणारे पक्षही विरोधात
०रामदेवबाबा फक्त एक दिवस आंदोलनात; नंतर गायब
०समाजातील इतर वर्गांकडूनही विशेष पाठिंबा नाही
०सरकारकडून कोणताही संपर्क नाही
०कोणतीच मागणी तातडीने मान्य करण्यासारखी नाही
०केजरीवाल, शिसोदिया, गोपाल रॉय यांची प्रकृती अत्यवस्थ
०अण्णाही बेमुदत उपोषण करण्याच्या स्थितीत नाहीत

आता गुजरातमध्ये परीक्षा

०या वर्षी गुजरात, हिमाचलमध्ये निवडणुका. मात्र लोकायुक्त निवडीवरून गुजरातमध्ये वाद, प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्याने त्याला महत्त्व
०पुढील वर्षी मध्यप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, राजस्थानसह 10 राज्यांत विधानसभा निवडणुका
०2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुका. अण्णा राजकारणात आल्याचा कॉँग्रेसला जास्त फटका बसेल.

... आणि सरकारची संसदेत

०टीमच्या राजकीय पवित्र्याला सरकार पावसाळी अधिवेशनात उत्तर देण्याच्या तयारीत
०राज्यांमध्ये निवडणुकांपूर्वी लोकपाल विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न
०सरकारची भ्रष्ट प्रतिमा सुधारण्यासाठी पावले उचलणार

अण्णांची 4 सूत्रे
०देशावर प्रेम करणारेच निवडून यावेत
०त्यांना निवडून आणणे सर्वांची जबाबदारी
०मनी, मसलचा उपयोग कदापिही होऊ नये
०आम्ही सेवक आहोत, सेवकच राहू
...आणि 3 वचने
०उमेदवार जनता ठरवणार
०जी नावे येतील, त्यांचे पॅनल वेबसाइटवर जाहीर करू
०3 लाख ग्रामसभा भ्रष्टाचाराविरोधात साथ देणार असतील तर रस्त्यावर येण्याची तयारी
अण्णांची चळवळ भरकटतेय का?
टीम अण्णाची फसलेली ब्लॅक कॉमेडी (अग्रलेख)
टीम अण्णाचा आरोप, ९ राज्यात \'ब्लॅक आऊट\' सरकारचे कारस्थान