आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीची चिंता नको, शेवटपर्यंत लढणार - अण्णा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भ्रष्टाचार विरोध आणि सक्षम लोकपालसाठी टीम अण्णाने सुरू केलेल्या उपोषणाचा शनिवारी चौथा दिवस होता. मात्र, सरकारने याची साधी दखलही घेतलेली नाही. दरम्यान, रविवारपासून अण्णा हजारे बेमुदत उपोषण सुरू करत असून गर्दीची चिंता आपल्याला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहू, असे अण्णांनी म्हटले आहे.

जंतर-मंतरवर टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि गोपाल रॉय यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जनलोकपाल विधेयक पारित करावे आणि भ्रष्ट नेत्यांच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक नेमावे, अशी टीम अण्णाची मागणी आहे.

शनिवारी अण्णांनी सरकारवर हल्ला चढवला. सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे वारंवार उपोषण करावे लागत असल्याचे ते म्हणाले. जे लोक आंदोलनात जमलेल्या गर्दीविषयी बोलत आहेत त्यांना वास्तवात गर्दीचा अंदाजच नाही. देशातील 400 जिल्ह्यांत हे आंदोलन सुरू आहे, असेही अण्णांनी नमूद केले.
पंतप्रधानांच्या घरावर धडक - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या ‘7 रेसकोर्स’स्थित निवासस्थानी शनिवारी काही लोक धडकले. हे अण्णासर्मथक होते, असे मानले जाते. लोकांनी घराच्या दिशेने कोळसा फेकल्याचाही आरोप होत आहे. पोलिसांनी 10 महिलांसह शंभरावर लोकांना ताब्यात घेतले. दरम्यान, इंडिया अगेन्स्ट करप्शनचे माध्यम संयोजक ए. मुरलीधरन यांनी असा कोणताही कार्यक्रम निश्चित केला नव्हता, असे सांगितले.
अण्णा समर्थकांची पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शने
अण्णा राजकारणात! जनतेतून उमेदवार निवडणार
अरविंद, किरण, रामदेव यांनी निवडणूक लढवली तर माझा पाठिंबा- अण्णा हजारे