आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Says If Arvind, Kiran, Ramdev, Contest Elections, I Will Support Them.

अरविंद, किरण, रामदेव यांनी निवडणूक लढवली तर माझा पाठिंबा- अण्णा हजारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई जिंकायची असेल तर फक्त उपोषण व आंदोलन करणे हा त्यावर पर्याय नाही तर त्यावर राजकीय पर्यायी व्यवस्था असणे गरजे आहे. ती व्यवस्था तयार करण्यासाठी अरविंद केजरीवाल, बाबा रामदेव व किरण बेदीसारख्या माझ्या सहका-यांनी निवडणूक लढवली तर माझा त्यांना पाठिंबा असेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
दरम्‍यान, टीम अण्‍णाच्‍या उपोषणस्‍थळी महिला पत्रकारांसोबत काही जणांनी असभ्‍य वर्तन केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अण्‍णा उतरणार राजकारणात
एका खासगी वृत्तवाहिनींशी अण्णांनी मुलाखत दिली. त्यावेळी अण्णांना विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषगांने अण्णांनी भ्रष्टाचारविरोधी लढा व परदेशात असलेल्या काळ्या पैशांबाबत चर्चा केली.
अण्णा म्हणाले, देशातील भ्रष्टाचार खरोखरच नष्ट करायचा असेल तर, उपोषण व आंदोलन पुरेसे ठरणार नाही. त्यासाठी राजकीय व्यवस्थेसारखा पर्याय उपलब्ध पाहिजे. राजकीय प्रक्रियेतून सत्ता मिळते व त्या सत्तेतून तुम्ही हवे तसे बदल घडवू शकतो. लोकांना सशक्त पर्याय आहे. लोक उपोषण, आंदोलन याला कंटाळले आहेत. त्यासाठीच काहीतरी नवीन पर्यायी व्यवस्थेची गरज भासत आहे. त्यामुळे निवडणूक लढवून त्यावर लढा द्यायला हवा. मात्र मी निवडणूक लढविणार नाही. मात्र, स्वच्छ चारित्र्यांच्या लोकांसाठी मी पुढे जाईन व त्यांच्या प्रचारात भाग घेईन. मला विश्वास वाटतो प्रामाणिक लोक कोणत्याही पॉवर व पैशाशिवाय निवडून येऊ शकतात. त्यासाठी मी लोकांना भेटून जनजागृती करीत आहे करणार आहे.
अण्णा व त्यांच्या सदस्यांनी बुधवारपासून केंद्रातील १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीसाठी समिती नेमावी यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन सुरु केले आहे. मात्र, टीम अण्णात सुसूत्रता व एकवाक्यता नसल्याने मतभेद समोर येत आहे. त्यातच टीम अण्णांचा प्रचार व आंदोलन हे केवळ मनमोहन सिंग सरकार व काँग्रेसविरोधात असल्याचे लोकांना जाणवू लागले आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनातील लोकांचा सहभाग हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे अण्णांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसने अण्णा हजारे व टीम अण्णाच्या सदस्यांना यापूर्वीच आवाहन केले आहे की, जनतेतून निवडून या व हवा तसा देशात बदल घडवा.
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा पाठिंबा
सलमान खुर्शीद यांची 'गुप्त' भेट घेतली का? पत्रकारांच्या प्रश्नावर भडकले अण्णा
आता आश्‍वासने देऊन चालणार नाहीः अण्‍णा हजारे, रामदेव बाबा पुन्‍हा एकत्र