आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Another Poster Against Modi Creates Flutter In Rajkot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींविरोधात आणखी एक पोस्‍टर: भाजप नेत्‍यांचा खूनी असल्‍याचा उल्‍लेख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट- गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍याविरोधात गुजरातमध्‍ये जोरदार पोस्‍टर युद्ध सुरु झाले आहे. आज राजकोटमध्‍ये आणखी एक पोस्‍टर झळकले असून त्‍यात मोदींवर स्‍वतःच्‍याच पक्षाच्‍या नेत्‍यांचा खूनी, असा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे हे युद्ध चांगलेच पेटणार आहे.
राजकोट हा नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक केशुभाई पटेल यांचा गढ आहे. मोदींविरोधात आज झळकलेल्‍या पोस्‍टरमध्‍ये मोदींचा हरेन पांड्या यांचा तसेच केशुभाई पटेल यांच्‍या पत्‍नी लीलाबेन पटेल यांचे खूनी, असा उल्‍लेख केला आहे. एवढेच नव्‍हे तर भाजपविरोधातही एक उल्‍लेख करण्‍यात आला आहे. राज्‍यातील आरटीआय कार्यकर्त्‍यांचे मारेकरी, असे भाजपला उद्देशून लिहीण्‍यात आले आहे.
नरेंद्र मोदी रविवारी राजकोटमध्‍ये जलतरण स्‍पर्धेच्‍या उद्घाटनासाठी गेले होते. त्‍यांच्‍या विरोधात हे पोस्‍टर्स लावण्‍यात आले होते. मोदींच्‍या राजकोटमध्‍ये दाखल होण्‍यापूर्वीच शहरात पोस्‍टर्स लावण्‍यात आले होते. यावेळी मोदींसोबतच भाजपलाही लक्ष्‍य करण्‍यात आले होते. मोदी आणि भाजपला खूनी म्‍हणून उल्‍लेख करण्‍यात आला. काही दिवसांपासून मोदी आणि केशुभाई पटेल यांच्‍यातील वाद विकोपास गेला आहे. त्‍यामुळे पटेल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्‍वतंत्र पक्ष स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या पोस्‍टर्समधून ही बाब अधोरेखीत होते.
गुजरातमध्‍ये पुन्‍हा पोस्‍टर वॉर, मोदींना दिली 'खाष्‍ट सासूची' उपमा
बोल इंडिया बोल : मोदी - नितीशकुमार वाद, कोण ठरणार वरचढ
या कारणांमुळे मोदी भाजपात आहेत सर्वांपेक्षा वरचढ