आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. अब्‍दुल कलाम पुन्‍हा राष्‍ट्रपती होणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः देशाच्‍या राष्‍ट्रपतींच्‍या निवडणूकीसाठी हालचालींना वेग आला आहे. काही नावांवर जोरात चर्चा सुरु असून त्‍यात माजी राष्‍ट्रपती अब्‍दुल कलाम यांना पुन्‍हा राष्‍ट्रपतीपदावर विराजमान करण्‍याचीही शक्‍यता बळावली आहे. काही राजकीय पक्षांनी कलाम यांच्‍या नावाला अनुकुलता दर्शविली आहे. कलाम यांच्‍याशिवाय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी तसेच संरक्षणमंत्री ए. के. एंटोनी यांच्‍या नावाचीही चर्चा आहे.
जुलै महिन्यात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा कार्यकाळ संपत आहे. काँग्रेसने आपल्याच पक्षातील उमेदवारासाठी जोरदार फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसकडून प्रणवदा आणि एंटोनी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तर माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या अराजकीय व्यक्तीच्या उमेदवारीसाठी तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि अण्णाद्रमुक तसेच भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काल राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनीही हीच भूमिका मांडली होती. त्यामुळे काँग्रेसला आव्हान देण्यासाठी एक भक्कम आघाडी उभा राहण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव पुढे आले होते. परंतु, सलग दुस-यांदा महाराष्‍ट्रातून राष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवारीला विरोध झाला. त्‍यामुळे कॉंग्रेसने त्‍यांचे नाव वगळले.
अराजकीय व्‍यक्तीला राष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवारीसाठी बहुमत निर्माण झाल्‍यास माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे पुन्हा एकदा देशाचे राष्ट्रपती होऊ शकतात. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सरकारजवळ पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यानां इतरांच्या मतानुसार राष्ट्रपती पदासाठी उमेदवार द्यावा लागण्याची शक्यता आहे.
पुण्यातील बंगल्याच्या जागेवरुन राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील अडचणीत?
राष्‍ट्रपती निवडणूकः प्रादेशिक पक्षांवरच सर्वांची मदार