आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर मग खुशाल चालवा माझ्यावर देशद्रोहाचा खटला - केजरीवाल

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टीम अण्णाचे प्रमुख सदस्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, माझ्यावर देशद्रोहाचा खटला भरायचा असेल खुशाल भरा. काल केजरीवाल यांनी नोएडा येथे भाषण करताना म्हटले होते की, भारतीय संसदेत गुंड व लुटारुच्या टोळ्या आहेत. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर राजकीय गदारोळ माजला होता. केजरीवाल यांना अटक करावी, अशी मागणी लालूप्रसाद यांनी केली होती. तसेच त्यांच्यावर संसदेचा अपमान केला म्हणून देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर केजरीवाल यांनी टि्वट करताना म्हटले आहे, की मी जे बोललो ते सत्य असून माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. संसदेत अशा प्रकारचे लोक, खासदार आहेत. त्यामुळेच आपण असे बोललो. हा संसदेचा अवमान किंवा अपमान नसून खरी वस्तुस्थितीबाबत मी मत मांडले आहे.
माझे मत हे वस्तुस्थितीला धरुन आहे ते जर कुणाला चुकीचे वाटत असेल त्यांनी माझ्यावर खुशाल खटला भरावा, मी त्याला तोंड देईन.
संसद व विधानसभेत गुन्हेगार, कार्पोरेट माफिया आणि भ्रष्ट लोकांचा भरणा आहे. त्यांना आता हिशोब मागण्याची वेळ आली आहे. त्यासाठी स्वातंत्र्याच्या दुस-या लढाईची गरज आहे. संसद व विधानसभा ही लोकशाहीचे मंदीर आहे. तिथे हे लोक ब्लू फिल्म पाहतात, विधायके फाडून टाकतात आणि एकमेंकाना खुर्च्या फेकून मारतात, असही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
देशाच्या संसदेत बसले गुंड आणि लुटारू - केजरीवाल