आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट आसामहून : ना घुसखोर जाणार, ना होणार आसाम शांत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भलेही आसाममधील दंगली थांबल्या; परंतु हिंसाचार पुन्हा होणार नाही, याची मुळीच शाश्वती नाही. कारण समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. बोडो नेते काम्पा बोरगियारी म्हणतात, बांगलादेशी जोपर्यंत येथे येऊन घुसखोरी करत राहतील, तोपर्यंत हिंसा होत राहील. या घुसखोरांचे मुंबई ते दिल्लीपर्यंत कोठेही पुनर्वसन केले जाऊ शकते. आमच्याकडे मात्र केवळ चार जिल्हे आहेत. आम्ही त्यांना येथे कब्जा करू देणार नाहीत.
ही लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. बोडो टेरिटोरियल कौन्सिलच्या भागात या मुद्द्यावरून दहा वर्षांत सहा वेळा दंगल झाली आहे. याचाच अर्थ प्रत्येक दीड वर्षानंतर दंगल पेटते. यात चारशेहून अधिक मुसलमान मारले गेले. परिस्थिती अजूनही तशीच आहे. काँग्रेसच्या घुसखोरांना मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड इत्यादी नागरिकतेसंबंधीचे कागदपत्रे मिळवण्यासाठी मदत केली जाते. त्याच्या बदल्यात ते पक्षाला मतदान करतात. आसाम राज्य देशाच्या एका कोप-यात आहे. त्यामुळे या गोष्टीची कोणालाही पर्वा नाही, अशी खंत बोडो नेत्यांनी व्यक्त केली.
हे घुसखोर याच संख्येने दिल्लीत जाऊन राहतील, त्या दिवशी आम्हाला सर्वाधिक आनंद होईल, असे बोडो आमदार कमल सिंग नारजरी म्हणाले. दुसरीकडे आसाममध्ये राहणा-या मूळ नागरिकांपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे, ही धक्कादायक बाब जनगणना अधिका-यांना दिसून आली. मतदार केवळ वयस्कर असतात; परंतु संख्या प्रचंड वाढली आहे. याचा अर्थ बोगस मतदारांची संख्या अधिक आहे. गंमत म्हणजे नारजरी यांचा बोडो पीपल्स फ्रंट गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस सरकारमधील सहकारी पक्ष म्हणून काम करत आहे. फ्रंटचे तीन आमदार मंत्री राहिले आहेत. 2011 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी फ्रंटचे एक आमदार चंदन ब्रह्मा हे सरकारमध्ये पर्यटनमंत्री आहेत. त्यावर बोडो कौन्सिल चालवायची आहे. सरकारविरुद्ध राहून हे काम करता येऊ शकत नाही, अशी सबब काम्पा देतात. आसाममधील समस्येवर एकच उपाय आहे. घुसखोरांना हटवले पाहिजे, असे बोडोलँड विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक जनीन मुशाहरी यांना वाटते.

बोडो शिकवणारे प्रो. हुसैन लपून वावरतात
बोडो नी मुस्लिम हे एका चुंबकाचे विरुद्ध ध्रुव आहेत; पण डॉ. इस्माईल हुसैन यांनी दोन टोके जोडली. गेल्या 19 वर्षांपासून ते बोडो भाषेचे अध्यापन करत आहेत. ते बोडोलँड विद्यापीठात भाषा विभागाचे प्रमुख आहेत. याविषयी त्यांना कधी भय वाटले नाही; परंतु दंगलीने ते हादरले. ‘आपण सध्या कोकराझारच्या बाहेर आहोत. दंगलीत लोकांना भान नसते. त्यांना योग्य-अयोग्य यातील फरक लक्षात येत नाही.’ ते मूळचे गोसाइगावचे आहेत. लहानपणापासून आदिवासींसोबत राहत असल्याने बोडो भाषा त्यांना आवडली. त्यानंतर त्यांनी पीएचडी करून विद्यापीठात नोकरी मिळवली.
धगधगता आसाम
आसाम मध्ये लष्कराच्या काफिल्यावर हल्ला, एक जवान शहिद