आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नितीशकुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटणा । बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सेवायात्रेवर संतप्त जमावाने बुधवारी जोरदार दगडफेक केली. चौसा गावाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात मुख्यमंत्री सुरक्षित असले तरी संतप्त ग्रामस्थांनी अर्धा डझन गाड्यांची नासधूस केली आहे.
चौका गावात हा प्रकार घडला.
ग्रामस्थांनी रस्ते, वीज, पाणी आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. नितीशकुमार यांनी ताफा थांबवून आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यांनी ग्रामस्थांना रस्ता बनविण्याचे आश्वासन दिले व गाडीत बसून परत जाण्यास ते निघाले. परंतु मुख्यमंत्र्यांनी आपले गाºहाणे अर्धेच ऐकले, असे म्हणत ग्रामस्थांनी कुमार यांच्या ताफ्यावर जोरदार दगडफेक केली.