आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अटकेचे दु:ख नाही, आनंद बिग बींना पाहिल्याचा’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - अटक होण्याचे वा अमिताभ यांच्या हातून थप्पड खाल्ल्याचे दु:ख अजिबात नाही. या निमित्ताने अमिताभ यांना इतक्या जवळून बघायला मिळाले याचेच समाधान वाटते. हे शब्द आहेत बच्चन यांच्या बंगल्यात घुसलेल्या देपालपूरच्या चोराचे.
तीन दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या जलसा बंगल्यात घुसून एका युवकाने चोर केली होती. सुमारे आठ ते दहा हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी दिलीप नामक आरोपीला अटक केली.
मुंबई पोलिस गुरुवारी दिलीपला मिर्झापूर या त्याच्या मूळ गावी घेऊन आले. घराची झाडाझडती घेतल्यानंतर रात्री उशिरा पोलिस पुन्हा मुंबईला परतले. दिलीपविरुद्ध देपालपूर ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल आहे, परंतु चोरीचा नाही.
अमिताभ यांनी दोन थापडा मारल्या - मुंबईला गेल्यावर मला अमिताभ यांना पाहण्याची इच्छा झाली. बंगल्यावर गेलो आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून मागील बाजूच्या झाडावर चढलो. मागच्या बाल्कनीतून मग बंगल्यात घुसलो. तिथेच एका खोलीत अमिताभ आणि जया बच्चन होते. त्यांच्या जवळच असलेल्या एका टेबलावर पर्स होती. मी ती उचलताच अमिताभ यांनी मला बघितले. मला दोन थापडा लगावून त्यांनी गार्डला बोलावून घेतले, असे दिलीपने सांगितले.