आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balkrishn, Yogguru Ramdev Baba, Cbi, Investigation

बालकृष्ण यांची सीबीआयची चौकशी सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: योगगुरू रामदेव बाबा यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या विरोधात सीबीआयने प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे.
बालकृष्ण यांनी बनावट पासपोर्ट बाळगल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रविवारी या प्रकरणात सीबीआयच्या तपास अधिकाºयांनी चौकशीला प्रत्यक्षात सुरुवात केली. याशिवाय गंभीर बाब म्हणजे बालकृष्ण यांच्याकडे एकापेक्षा अधिक बनावट पासपोर्ट असल्याची माहितीही तपास अधिकाºयांना मिळाली आहे.
बालकृष्ण हे मूळचे नेपाळचे असून त्यांनी बनावट पासपोर्टच्या मदतीने भारतातील नागरिकत्व मिळविले आहे, असेही एका अधिकाºयाने सांगितले.
दरम्यान, याच महिन्यात बाबा रामदेव यांच्या विरोधात कडक पावले उचलल्यानंतर सरकारनेच बालकृष्ण यांच्याकडे बनावट पासपोर्ट असल्याचे म्हटले होते. बाबा रामदेव यांच्या ३४ कंपन्या बालकृष्ण चालवितात. रामदेव बाबा यांच्या आंदोलनानंतर बालकृष्णन यांच्या विरोधात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.