आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतीनिकेतनमध्ये हॉस्टेलच्या वॉर्डनने विद्यार्थिनीला पाजले मूत्र!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांतीनिकेतन (पश्चिम बंगाल)- विश्वभारती विद्यापीठांतर्गत एका शाळेच्या वसतीगृहातील महिला वॉर्डनने पाचवीतल्या विद्यार्थिनीला कठोर शिक्षा दिली आहे. बिछाना ओला केल्यामुळे वॉर्डनने तिला मूत्र पिण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती उजेडात आली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी वॉर्डनविरुद्ध बोलपूर पोलिस ठाण्‍यात तक्रार केली आहे.
पोलिससूत्रांनूसार, पीडित विद्यार्थिनी पथ भवन येथील असून ती विश्वभारती विद्यापीठाच्या एका निवासी शाळेत शिकते. शनिवारी रात्री या विद्यार्थिनीने बिछाना ओला केला होता. त्याचा राग येऊन वसतीगृहाच्या महिला वॉर्डनने तिच्या तोंडावर चादर ‍‍पिळून विद्यार्थिनीला मूत्र पिण्यास मजबूर केले. अशी कठोर शिक्षापाहून विद्यार्थिनीचे पालक चांगलेच संतापले आहे. त्यांनी याबाबत संस्थाचालकांना जाब विचारला आहे.
तर बिछाना ओला करण्याची सवय तुटावी, म्हणून ही शिक्षा‍ दिल्याचे वॉर्डनने सांग‍ितले.
पीडीत विद्यार्थिनीच्या पालकांसह अनेक पालकांनी आपल्या मुलींना घरी नेल्या आहेत.
विश्वभारतीचे संचालकांनी या घटनेचे दखल घेतली असून तपास करण्‍यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. विद्यार्थिनीचे पालक हॉस्टेलमध्ये जबरदस्तीने घुसल्याने संचालकांनीही त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी राष्‍ट्रीय बाल संरक्षण अधिकार आयोगाने (एनसीपीसीआर) संस्थेला अहवाल मागितला आहे.
उल्हासनगरमध्ये नराधम पित्याचे मुलीवर अत्याचार
मुलांचा हट्टीपणा की इमोशनल अत्याचार?
मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी समिती