आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताला भिकारीमुक्त करा : नितीशकुमार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताला भिकारीमुक्त करण्यासाठी देशव्यापी स्तरावर ‘भिक्षावृत्तीमुक्त भारत मोहीम’ सुरू करण्याची मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नियोजन आयोगाकडे केली आहे.
नितीश यांनी म्हटले आहे की, भिक्षावृत्ती कुठल्याही समाजासाठी लांच्छनास्पद असते. त्यामुळे यावर लवकरात लवकर काम सुरू व्हायला हवे. समाजातील दुर्लक्षित घटक असलेले भिकारी, तृतीयपंथी, आदिवासी हे विकास योजनांच्या लाभांपासून वंचित राहतात. या लोकांसाठी विशेष योजना तयार करण्याची गरज असल्याचेही नितीशकुमारांनी सांगितले आहे.
ते म्हणाले की, समाजातील हा गरीब वर्ग मानसिक व शारीरिक स्तरावर पोषक आहार व आरोग्यापासून वंचित असल्यामुळे गरीबच राहतो. या सर्वांचा अतिदरिद्री वर्गात समावेश करून त्यांचे जीवनमान उंचवावे. नुकत्याच झालेल्या राष्टÑीय विकास परिषदेत हा मुद्दा नितीशकुमार यांनी मांडल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
भारत आणि भिक्षावृत्ती
दिल्ली स्कूल आॅफ सोशल वर्कने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार 1991 नंतरच्या एका दशकात भिकाºयांच्या संख्येत एक लाखाची वाढ झाली आहे. अ‍ॅक्शन एडच्या एका अहवालानुसार दिल्लीत भिकाºयांची संख्या 60 हजारांपेक्षा जास्त आहे. मुंबईत ही संख्या 3 लाखांच्या आसपास आणि कोलकातामध्ये 75 हजार आहे. पोलिस रेकॉर्डनुसार बंगळुरूमध्ये 50 हजार लोक भीक मागतात. हैदराबादमध्ये दर 354 लोकांमागे एक जण भिकारी आहे. महाराष्टÑात दरवर्षी भिकेतून 180 कोटी रुपये गोळा होतात, असे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे; पण कोणत्याही भिकाºयाकडे फार पैसे नसतात. ते दिवसाला 20 ते 30 रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत कमवतात. ही कमाईसुद्धा दररोज ठरावीक नसते. अनेकदा भिकाºयांना उपाशीपोटी झोपावे लागते.