आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूर- राजस्थानमधील नर्स भंवरीदेवी हिला जाळून मारल्यानंतर तिची हाडे व राख एका कॅनॉलमध्ये टाकणारा मुख्य आरोपी ओमप्रकाशने बुधवारी दुपारी सीबीआयला मोठा झटका दिला. सीबीआयच्या न्यायालयात मॅजिस्ट्रेटच्या पुढे ओमप्रकाश यांचे घटनेच्या कलम १६४ नुसार पुराव्यासाठी जबाब घेण्यात येणार होता. मात्र, ओमप्रकाश याने तिथे चुप्पी साधत काहीही बोलण्यास नकार दिला. हा जबाब बंद खोलीत कॅमेरयासमोर होणार होता. मात्र ओमप्रकाश त्यास नकार दिल्याने त्याला पुन्हा कारागृहात पाठविले आहे.
राजस्थानातील बहुचर्चित भवरी देवी अपहरण प्रकरणाचे गुढ सीबीआयने उकलून काढले आहे. माजी मंत्री महिपाल मदरेणा आणि आमदार मलाखानसिंह बिश्नोई यांनी मिळून भवरीदेवीच्या अपहरण व हत्त्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. भवरीदेवीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्यावर जालोडा येथे एका कालव्याजवळील खड्ड््यात तिचा मृतदेह जाळण्यात आला. त्यानंतर त्याची राख कॅनालमध्ये फेकून देण्यात आली. सोहनलाल व शहाबुद्दीन यांनी 1 सप्टेंबर रोजी भवरीचे अपहरण करून तिला कुख्यात गुन्हेगार विशनाराम गँगच्या ताब्यात दिले. या गँगने तिची हत्या करून तिचे शव एका खड्ड्यात जाळले व नंतर ती राख जालोडा कालव्यात फेकून दिली होती. सीबीआयने घटनास्थळाची ओळख पटवून त्या ठिकाणी सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात केले होते. त्यानंतर सीबीआयने विशनारामचा भाऊ ओमप्रकाशकडे चौकशी केली असता त्याने भवरीदेवीला जाळून तिची राख पाण्यात फेकून दिल्याचे कबूल केले होते. याशिवाय भंवरीदेवी प्रकरणात आरोपी भैरा राम आणि त्याच्या मुलाला अटक झाली आहे. या दोघांनी भंवरी देवीला जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध करून दिली होती.
भंवरी हत्याकांड : पुरावे मिळाले, आता मलखानची बहिण इंद्राचा शोध
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.