आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंवरी देवीला जाळण्यास लाकडे पूरविणारे आणखी दोघे अटकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - भंवरी देवी प्रकरणातील आरोपी भैरा राम आणि त्याच्या मुलाला अटक झाली आहे. या दोघांनी भंवरी देवीला जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध करून दिली होती. सीएफएसएलची टीम (केंद्रीय न्याय-वैद्यकशास्त्र प्रयोगशाळेचे पथक) जोधपूरला पोहोचली असून पुढील तपास सुरु आहे.
राजस्थानातील बहुचर्चित भवरी देवी अपहरण प्रकरणाचे गुढ उकलत चालले आहे. माजी मंत्री महिपाल मदरेणा आणि आमदार मलाखानसिंह बिश्नोई यांनी मिळून भवरीदेवीच्या अपहरण व हत्त्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे.
भवरीदेवीचे केवळ अपहरण झालेले नसून हत्या करण्यात आल्यावर जालोडा येथे एका कालव्याजवळील खड्ड्यात तिचा मृतदेह जाळण्यात आला. त्यानंतर त्याची राख कॅनालमध्ये फेकून देण्यात आली. सोहनलाल व शहाबुद्दीन यांनी 1 सप्टेंबर रोजी भवरीचे अपहरण करून तिला कुख्यात गुन्हेगार विशनाराम गँगच्या ताब्यात दिले. या गँगने तिची हत्या करून तिचे शव एका खड्ड्यात जाळले व नंतर ती राख जालोडा कालव्यात फेकून दिली, असे आता स्पष्ट झाले आहे. सीबीआयने बुधवारी घटनास्थळाची ओळख पटवून त्या ठिकाणी सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात केले. सीबीआयने विशनारामचा भाऊ ओमप्रकाशकडे चौकशी केली असता त्याने भवरीदेवीला जाळून तिची राख पाण्यात फेकून दिल्याचे कबूल केले.
आमदाराच्या बहिणीने घडवून आणली भंवरी देवीची हत्या
मदेरणाच्या फार्महाऊसवर भेटायचे मलखान आणि भंवरी
भंवरी सेक्स सीडी प्रकरणी मलखानला सीबीआय कोठडी