आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंवरी हत्याकांड : पुरावे मिळाले, आता मलखानची बहिण इंद्राचा शोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- भंवरीदेवी सेक्स सीडीप्रकरणी तिची जाळून हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर आता त्याबाबतचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. त्यानंतर सीबीआयने मुख्य आरोपी आमदार मलखानची बहिण इंद्राच्या तपासासाठी पावले उचलली आहेत.
जालोडामधील कालव्यात भंवरीचे मिळालेले घड्याळ व दागिने याची ओळख पटली आहे. या वस्तू भंवरीचा मुलगा साहील व पती अमरचंद यांनी ओळखल्या असून त्या भंवरीच्याच असल्याचे सिध्द झाले आहे. संबंधित घड्याळाची एक कडी ढिली झाल्याने भंवरीने घरात काढून ठेवली होती. ती कडी साहीलने रविवारी सीबीआयला सुपूर्त केली आहे.
भंवरीची हत्या करणारे आरोपी ओमप्रकाश व कैलाश यांनी सीबीआयला सांगितले की, भंवरीच्या राखेबरोबरच तिचे घड्याळ व दागिने कालव्यात फेकून दिले होते. त्यानुसार कालव्यात शनिवारी दागिने सापडले. दागिने व घड्याळ सापडल्यानंतर सीबीआयने साहीलला सर्किट हाऊसवर बोलावले होते. त्यानुसार पुरावे गोळा केले आहेत.
साहीलने जी कडी सीबीआयला दिली आहे व ती कडी व घड्याळाच्या इतर कडी त्याला मिळत्या-जुळत्या आहेत. तसेच कालव्यात सापडलेले घड्याळ आपल्या आईचेच असल्याचे साहीलने सीबीआयला सांगितले आहे. भंवरीच्या कानातील दागिनेही हातात आले असून ते भंवरीचे असल्याचे तिचा पती अमरचंदने सांगितले आहे.
'त्या' स्कॉर्पियोची चौकशी- जालोडा येथील कालव्यात भंवरीचे जळालेली हाडे व राख टाकण्यासाठी वापरण्यात आलेली स्कार्पियो गाडीची चौकशी सीबीआयने सुरु केली आहे. त्या गाडीतील सीटवरील कापडाचे सॅंपल घेण्यात आले आहे. भंवरीची हत्या केल्यानंतर त्या सीटवर भंवरीचे रक्त व केस याबाबतचा पुरावा सापडतो का ते सीबीआयला पाहयचे आहे. दरम्यान कालव्याची संपूर्ण तपासणी केली आहे. तपासकामासाठी कालव्याचे पाणी थांबविले होते. आता पुन्हा एखदा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
एक भंवरी, अन् भोव-यात फिरताहेत दहा कुटुंब
छायाचित्रांतून पाहा - भंवरी देवी प्रकरणाच्या तपासाची एक झलक
भंवरी देवीला जाळण्यास लाकडे पूरविणारे आणखी दोघे अटकेत
आमदाराच्या बहिणीने घडवून आणली भंवरी देवीची हत्या
मदेरणाच्या फार्महाऊसवर भेटायचे मलखान आणि भंवरी