आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदाराच्या बहिणीने घडवून आणली भंवरी देवीची हत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर -आमदार मलखान सिंह बिष्णोई यांची बहिण इंद्रा हिने भंवरी देवीची हत्या घडवून आणल्याची खळबळजनक माहिती सीबीआय तपासातून पुढे आली आहे. सर्व आरोपी इंद्रा हिच्या संपर्कात होते आणि पैशाची देवघेवही तिनेच केले होते. भंवरी देवी अपहरणकांडातील आरोपी सहिराम बिष्णोई याने सीबीआय तपासात, ही बाब उघड केली.
राजस्थानच्या राजकारणात वादळ आणलेल्या भंवरी देवीच्या हत्येमागे एका महिलेचा हात होता, ही बाब यानिमित्ताने समोर आली आहे.
सीबीआयकडून या प्रकरणी अधिकृत माहिती मिळू शकली नाही, परंतु इंद्रा हिला सहिराम आणि मलखान सिंह यांच्याशी आमने-सामने करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इंद्रा आणि तिचे दोन पुतणे (पुखराज, दिनेश) एक महिन्यापासून फरार आहेत. या तिघांना पकडण्यासाठी सीबीआयने गुरुवारी तिलवासनी आणि शेजारील गावांमध्ये धाडी टाकल्या, परंतु ते सापडू शकले नाहीत. सध्या सहीराम आणि मलखान सिंह हे दोघे कोठडीत आहेत.
मदेरणाच्या फार्महाऊसवर भेटायचे मलखान आणि भंवरी
भंवरी सेक्स सीडी प्रकरणी मलखानला सीबीआय कोठडी
'मी तर नावालाच नवरा होतो; मलखानच्या प्रेमात बुडाली होती भंवरी'