आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंवरी सेक्स सीडी प्रकरणी मलखानला सीबीआय कोठडी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपुर - भंवरीदेवी अपहरण आणि सेक्स सी़डी प्रकरणी अटक करण्यात आलेले आमदार मलखान सिंह बिश्नोई यांचे कोणत्याही क्षणी निलंबन होऊ शकते. मलखान सिंह यांना मंगळवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मलखान यांना २८ डिसेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. भंवरीचा पती अमरचंदच्या कोठडीत २२ डिसेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सीबीआयने मलखान सिंह यांना सोमवारी रात्री ७ वाजता अटक केली. ते मागील दहा दिवसांपासून सीबीआयला चकमा देत होते.
पुन्हा-पुन्हा सांगूनही मलखान सीबीआयपुढे आलेच नाहीत, तेंव्हा सीबीआयने संध्याकाळी आपला खाक्या दाखवला. सीबीआयने आमदाराच्या २ सुनांना सर्किट हाउसवर आणले. सुना आणि नातवंडांना सीबीआयने नेल्याची बातमी कळताच संध्याकाळी ७ वाजता मलखान हजर झाले.

गेल्या चार दिवसांपासून सीबीआय मलखान यांच्या मुलांची चौकशी करत होती. सोमवारी तिन्ही मुले सीबीआयसमोर आले होते, तेंव्हा मोठ्या मुलाने ( महेंद्र ) सांगितले की, मलखान हे संध्याकाळी ४ पर्यंत हजर होतील.

दिवसभर सुरु होती चौकशी : सोमवारी सीबीआयने खेडापा भागातील श्रवण बिश्नोई आणि सहिराम यांच्या केलनसर गावच्या हजारीराम याची चौकशी केली. श्रवणला पोलिसांनी आधीच आणले होते. उम्मेद नगरचे भंवरलाल, जुड़चे मोहनलाल, तिलवासनीचे राणाराम, पीपाड़चे गोरधन चौधरी आणि चुना व्यापारी गोकुलराम आदींचीही सीबीआयने चौकशी केली.
'मी तर नावालाच नवरा होतो; मलखानच्या प्रेमात बुडाली होती भंवरी'
भंवरी देवी प्रकरण : राजस्थानच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे
भंवरी सेक्स सीडी : राजकारण्यांचा काळा चेहरा पाहा छायाचित्रांतून