आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp karnataka crisis resolves ministers call back resignation

कर्नाटक : येडियुरप्पा समर्थक 9 मंत्र्यांचे राजीनामे मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरु- कर्नाटक भाजपमधील आणखी एका राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे. येडियुरप्पा समर्थक ९ मंत्र्यांनी आपले राजीनामे मागे घेतले आहेत.
मागील आठवड्यात जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी येडियुरप्पा समर्थक ९ मंत्र्यांनी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे राजीनामे सोपवले होते.
भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतल्यानंतर कर्नाटक भाजपातील हे पेल्यातील वादळ तात्पुरते का होईना शमले आहे. बंड केलेल्या मंत्र्यांनी म्हटले आहे की, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला आश्वासन दिले आहे. तसेच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी जगदीश शेट्टर आणि राजीनामा दिलेल्या मंत्र्यांना दिल्लीत बोलावले आहे. आज रात्री ते नवी दिल्लीत दाखल होणार आहेत.
येडियुरप्पा समर्थकांचे म्हणणे आहे की, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने आम्हाला आश्वासन दिले आहे की कर्नाटक भाजपमधील संकट लवकरच संपूर्ण निकालात काढू.