आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रणवदांच्‍या विरोधात भाजप कोर्टात जाणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- संयुक्‍त पुरोगामी आघाडीचे राष्‍ट्रपती पदाचे उमेदवार प्रणव मुखर्जींच्‍या विरोधात भारतीय जनता पक्ष याचिका दाखल करू शकतो. याचिका दाखल करण्‍याचे स्‍पष्‍ट संकेत भाजपचे विधी विभागाचे प्रमूख सत्‍यपाल जैन यांनी दिले आहेत. सत्‍यपाल जैन हे राष्‍ट्रपती पदाचे दुसरे उमेदवार पी ए संगमा यांचे वकीलदेखील आहेत. लाभाचे पद असतानाही प्रणव मुखर्जी यांनी राष्‍ट्रपती पदासाठी नामांकन दाखल केल्‍याचा आरोप लावण्‍यात आला आहे.
मुखर्जी यांनी नामांकन अर्ज भरण्‍यापूर्वी भारतीय सां‍ख्यिकी संस्‍था (आयएसआय)च्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला नव्‍हता. हे लाभाचे पद आहे. संगमा यांनी हाच मुद्दा उठवून मुखर्जीं यांच्‍या नामांकनाला विरोध दर्शवला होता. निवडणूक आयोगाने संगमांची मागणी फेटाळली होती.
संगमा यांनी बुधवारी निवडणूक आयोगाला या आदेशाची प्रत मागितली. यावर निवडणूक आयोगाने राज्‍यसभा महासचिव कार्यालयाला संगमा यांना आदेशाची प्रत उपलब्‍ध करून देण्‍यास सांगितले. संगमा यांनी बुधवारी लोकसभेच्‍या विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यांच्‍याशी चर्चा देखील केली. सुमारे दोन तास त्‍यांची चर्चा चालली. निवडणूक आयोगाकडून प्रत मिळाल्‍यानंतर पक्षातर्फे पुढील निर्णय घेण्‍यात येणार असल्‍याचे भाजप नेते एसएस अहलुवालिया यांनी सांगितले.
पुढे काय?
भाजपच्‍या संसदीय गटाकडून मुखर्जी यांच्‍या विरोधात न्‍यायालयात याचिका दाखल करण्‍याचा निर्णय घेतला जाण्‍याची शक्‍यता आहे. जर असे करण्‍यात आले तर निवडणूकीचे निकाल आल्‍यानंतर याचिका दाखल केली जाऊ शकते.
आपले मत
प्रणव मुखर्जींच्‍या सही प्रकरणास विनाकारण महत्‍व दिले जात आहे काय? की खरच हे एक गंभीर प्रकरण आहे. आपले मत खाली कमेंट बॉक्‍समध्‍ये लिहावे. आक्षेपार्ह मतास वाचक स्‍वत: जबाबदार असतील.
प्रणव मुखर्जी यांना दिलेल्या पार्टीत कैदी आमदारांचाही सहभाग
प्रणव मुखर्जींचा उमेदवारी अर्ज मंजूर, संगमांचा दावा फेटाळला
प्रणव मुखर्जींबद्दल सांख्यिकी संस्‍थेकडून चुकीची माहिती?
प्रणव मुखर्जी १३ जुलैला बाळासाहेब ठाकरेंची भेट घेणार
शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय प्रणव विजयी होणे शक्य नाही- बाळासाहेब ठाकरे