आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ब्लॅक’साठी अमिताभ बच्चनला ऑस्कर पुरस्कार हवा होता - दिलीपकुमार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बिग बी, तुम्हाला ऑस्कर मिळावा. यातून तुमच्या योग्यतेचा गौरव होईल, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एक पत्र पाठवल्याने अमिताभ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
‘ब्लॅक’मधील अभिनयासाठी आपला जगातील सर्वोच्च पुरस्काराने अर्थात ऑस्करने गौरव व्हायला हवा होता, असे मला वाटते. परंतु तसे झाले नाही हे दुर्दैव आहे. भारतीय अभिनेत्यांमध्ये या पुरस्कारासाठी आपणच मला त्या योग्यतेचे वाटता, असे दिलीपकुमार यांनी म्हटले आहे. रुपेरी पडद्यावरील महान अभिनेते दिलीपकुमार आणि दुसरीकडे सहस्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्यातील संवाद अलीकडेच ब्लॉगवरून रंगला. दिलीपकुमार यांनी माझ्यासाठी काढलेले कौतुकोद्गार हेच माझ्यासाठी पुरस्कारासारखे आहेत. त्याहून मोठा पुरस्कार माझ्यासाठी असू शकत नाही, असे अमिताभ म्हणतात. चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आहेत. परंतु दिलीपकुमार, युसूफ खान एकच आहेत. त्यांना मी चित्रपटात पाहिले, तेव्हापासून ते माझी प्रेरणा बनले आहेत. ट्विटरवरून दिलीपसाहेबांनी मला खास ट्विट केले. त्यावर मला काय बोलावे, हेच सुचत नाही. त्यामुळेच आता कोणी काही टीका केली तरी मी मनावर घेणार नाही. आता कोणाच्या मताचीही गरज राहिली नाही. त्यांच्याकडून आलेल्या शाबासकीपुढे आता काही राहिले नाही. हा माझा गौरव आहे. गेल्या बेचाळीस वर्षांत कोणत्याही अभिनेत्याच्या वाट्याला हे भाग्य आले नसावे. तत्त्व आणि मूल्य यांची पूर्णता अनुभवत आहे. माझा ज्या व्यक्तीवर विश्वास आहे, त्याच्याकडून मला हे मिळाले आहे. त्यांची जागा कोणालाही घेता येणार नाही.
‘ब्लॅक’ने थक्क केले !- 89 वर्षीय दिलीपकुमार स्वत:च्या ब्लॉगवर लिहिताना म्हणतात, बच्च्न यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार मिस केला हे दुर्दैव आहे. मला अलीकडच्या काळातील ‘ब्लॅक’ हा चित्रपट आवडतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर पडदा पडला. त्यानंतर सायरा व मी, आम्हा दोघांनाही शब्दच आठवत नव्हते. आपला अभिनय आमच्यासाठी थक्क करणारा अनुभव होता.