आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त २७७ हत्या अन् २२ नरसंहार, जाणून घ्या रणवीर सेनेच्या प्रमुखाबाबत...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- ब्रम्हेश्वर सिंह ऊर्फ बरमेश्वर मुखिया हे नाव बिहारमधील जातीय दंगली व लढाईमधील एक जाने-माने नाव होते. भोजपूर जिल्ह्यातील खोपिरा गावात राहणा-या मुखिया यांनी उच्च जातीतील असे व्यक्तिमत्त्व होते ज्याला वैयक्तिक संघटना उभे करणारे नेतृत्व मानले जात होते. बिहारमध्ये जेव्हा नक्षली आणि मोठ्या शेतक-यांत खुनी हल्ले होत त्यावेळी शेतक-यांनी मुखियाच्या मदतीने एक मोठी टोळी तयार केली होती. सप्टेंबर १९९४मध्ये मुखियाने आपल्या नेतृत्त्वाखाली एका संघटनेची स्थापना केली व त्याचे नाव रणवीर सेना असे ठेवले. त्यानंतर या सेनेचे प्रस्थ वाढले. नक्षल्यांबरोबर रोजच लढाई व हल्ले होऊ लागले. यात एवढे लोक मरु लागले की अखेर राज्य सरकारने मुखियाच्या रणवीर सेनेवर बंदी घातली. नव्वदच्या दशकात १९९७ साली लक्ष्मणपूरला जो नक्षली आणि रणवीर सेनेत नरसंहार झाला होता त्यात किमान ५८ दलित मारले गेले होते. या घटनेनंतर बिहारमधील जातीव्यवस्था अधिक प्रखरतेने देशासमोर आली होती. या घटनेला अंजाम देणारा म्हणून मुखियाचे नाव घेतले जात होते. हा नरसंहार ३७ उच्च जातीच्या हत्येनंतर करण्यात आला होता. जो सर्वात मोठा नरसंहार ठरला. त्याआधी दलित नक्षलवाद्यांनी बाडा येथे ३७ उच्चवर्णीयांना लढाई हल्ल्यात ठार मारले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच मुखियाने बाथे येथे ५८ दलितांना मारुन त्याचा बदला घेतला होता. त्यानंतर मुखियाने बथानी टोला नरसंहारात सहभाग घेतला होता. त्यावरुन त्याला तुरुंगात टाकले. त्याला पकडण्यासाठी सरकारने पाच लाख रुपयांचे बक्षिसही जाहीर केले होते. त्यानंतर तो २००२ पासून २०११पर्यंत तुरुंगात होता. गेल्या वर्षीच तो तुरुंगातून बाहेर पडला होता. बथानी सामुहिक हत्याकांडाच्या खटल्यात पोलिसांनी मुखियाला फरार घोषित केले. मात्र त्यावेळी तो तुरुंगात होता. बथानी हत्याकांडात तो अजूनही फरार घोषित आहे. आता मात्र तो मारला गेल्यामुळे हे सर्व खटले रद्द होण्याची शक्यता आहे. मुखियाच्या नावावर २७७ हत्या व २२ नरसंहार केल्याची माहिती आहे.
तुरुंगात असताना बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते की, शेतक-यांवर होणा-या हल्ल्यांकडे सर्वजणच दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे रणवीर सेनेची मी स्थापना केली. मात्र सरकारने माझ्या संघटनेला बदनाम करीत व जहालवादी ठरवित बंदी घातली होती. मुखिया म्हणायचा नक्षली लोकांकडे खूप शस्त्रे होती त्यामुळे शेतकरी त्यांच्याशी लढू शकत नव्हते. त्यामुळे नक्षल्यांनी शेतक-यांचा सर्वच मार्गानी छळ केला होता. त्यांना समर्थ लढा देण्यासाठीच मी संघटना स्थापन केली होती.
PHOTOS : रणवीर सेनेच्या प्रमुखांची हत्या कशी झाली ते पाहा!
ब्रह्मेश्‍वर सिंह यांच्‍यावर झाडल्‍या 40 गोळ्या, भोजपूरमध्‍ये संचारबंदी
नितीशकुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक