आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Capital Delhi Is On Hit List Of Terrorist Outfit Lashkar e taiyyaba

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजधानी दिल्‍ली 'लष्‍कर'च्‍या निशाण्‍यावर, जुंदलला 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्‍ली- राजधानी दिल्‍ली ही लष्‍कर-ए-तैय्यबाच्‍या निशाण्‍यावर असल्‍याचा खुलासा दहशतवादी अबू जुंदल उर्फ जबिउद्दीन अन्‍सारीने केला आहे. दिल्‍ली पोलिसांना त्‍याने लष्‍करच्‍या कटाची माहिती दिली. इंडिया गेट, लाल किल्‍ला यासारखी महत्त्वाची आणि गर्दीची ठिकाणे लष्‍करच्‍या निशाण्‍यावर असल्‍याचे त्‍याने सांगितले. दिल्‍लीच्‍या पोलिस आयुक्तांनीही यास दुजोरा दिला असून या ठिकाणांच्‍या सुरक्षेचा आढावा घेण्‍यात येत आहे. काही त्रुटी उघडकीस आल्‍या असून त्‍या सुधारण्‍यात येतील, असे दिल्‍ली पोलिसांनी स्‍पष्‍ट केले. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाला पाठवियात आल्‍याचेही सांगण्‍यात आले.

जुंदलला 31 पर्यंत पोलिस कोठडी

अबू जुंदल उर्फ जबिउद्दीन अन्‍सारी याला 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. जुंदलला आज सकाळी विमानाने मुंबई आणण्‍यात आले. त्‍यानंतर त्‍याला दुपारी किल्‍ला न्‍यायालयात सादर केले. अतिशय कडेकोट बंदोबस्‍तानात त्‍याला न्‍यायालयात आणण्‍यात आले होते.
दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारीच त्याला दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात दिले आहे. महाराष्ट्रात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी त्याची चौकशी करता यावी, यासाठी एटीएसने त्याच्या कोठडीची मागणी केली होती.
सकाळी विमानाने त्याला मुंबईत आणताच काळाचौकी पोलिस ठाण्यात ठेवले होते. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणासह औरंगाबाद येथील शस्‍त्रास्‍त्र प्रकरण, पुण्यातील जर्मन बेकरी स्‍फोट, नाशिक तुरुंगाची केलेली पाहणी या प्रकरणांत त्याची चौकशी होणार आहे. यासाठी विविध तपास यंत्रणांनी त्‍याचा ताबा मागितला आहे.
जबीने केली होती नाशिक शहराची रेकी, पोलिस अकादमी होते लक्ष्‍य
आयएसआय मेजर सूचना देत होता, जबिउद्दीन अन्सारीने दिली माहिती
नरेंद्र मोदी होते अबू जुंदलच्‍या निशाण्‍यावर