आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालव्यात आढळले भंवरीचे दात, घड्याळ, लॉकेट अन् कानातली बाळी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - जालोडा गावाजवळून वाहणा-या राजीव गांधी उपसा कालव्यात भंवरी देवीचे दात, घड्याळ, लॉकेट, मंगळसूत्र अन् कानातली बाळी आदी आढळून आले. यामुळे भंवरी देवीच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास मोठी मदत होणार आहे.
दात आणि जळालेली हाडे वगळता अन्य वस्तू भंवरी देवी हिच्या कुटुंबियांना दाखवून खात्री केली जाणार आहे. यामुळे सापडलेल्या वस्तू आणि अवशेष भंवरी देवीचेच आहेत किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. पाणबुड्यांच्या मदतीने हे शोधकार्य पार पडले. यावेळी सीबीआयचे डीआयजी अशोक तिवारी, रेंज आयजी उमेश मिश्र आणि ग्रामीण एसपी नवज्योती गोगोई आदी उपस्थित होते. सापडलेल्या वस्तू उपरोक्त अधिका-यांच्या उपस्थितीत सीलबंद करण्यात आले.
भंवरीदेवी प्रकरणातील आरोपी सीबीआयच्‍या जाळ्यात आल्‍यानंतर आणखी काही खळबळजनक तथ्‍य समोर येत आहेत. सीबीआयच्‍या पथकाला काल जालोडा गावाजवळच्‍या कालव्यातून अनेक पुरावे मिळाले. शनिवारीही जालोडा गावाजवळच्‍या राजीव गांधी कालव्‍यामध्‍ये शोधकार्य सुरुच आहे.
एक भंवरी, अन् भोव-यात फिरताहेत दहा कुटुंब
छायाचित्रांतून पाहा - भंवरी देवी प्रकरणाच्या तपासाची एक झलक
भंवरी देवीला जाळण्यास लाकडे पूरविणारे आणखी दोघे अटकेत
आमदाराच्या बहिणीने घडवून आणली भंवरी देवीची हत्या
मदेरणाच्या फार्महाऊसवर भेटायचे मलखान आणि भंवरी