आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्यात विष टाकून वन्य प्राण्यांची शिकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महासमुंद (छत्तीसगड) - उन्हाळ्यात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिका-यांनी प्राण्यांना पाण्यातून विष देण्याचा प्रकार छत्तीसगडमध्ये समोर आला आहे. पालीच्या जंगलातील तीन तहानलेल्या गव्यांची शिकार नुकतीच या पद्धतीने करण्यात आली. काही दिवसांपूर्वी एक हरीणही असेच पाण्यात विष टाकून मारण्यात आले होते.
मृत गव्यांमध्ये एक नर आणि दोन माद्या आहेत. शिका-यांनी आठवडाभरात असे सहा गवे मारले आहेत. जिल्हा वनाधिकारी देवाशीष बॅनर्जी यांनी सांगितले की, पालीच्या जंगलात शिका-यांची घुसखोरी पाहता वनरक्षकांची एक तुकडी त्यांचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.
रेंजर मनोज चंद्राकर यांनी सांगितले की, हे तिन्ही गवे तरुण होते. पंचनामा व शवविच्छेदन करून या तिन्ही गव्यांचे मृतदेह घटनास्थळीच जाळण्यात आले. ज्या ठिकाणी हे गवे मृतावस्थेत आढळले तेथे एका खड्ड्यातील पाण्यात युरिया मिसळलेला आढळला असून, हे पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहितीही वनाधिका-यांनी दिली.