आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Prince Rahul Gandhi Involved With An Afghan Princess

PHOTOS:राहुल गांधींना पडला 'वॅरोनिका'चा विसर, अफगाणची राजकुमारी नवी गर्लफ्रेंड?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: अफगाणिस्तानची राजकुमारी आणि कॉंग्रेसचे राजकुमार राहुल गांधी यांच्यात 'गुटूर गू' सुरु असल्याचे वृत्त 'दी संडे गार्जियन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या खळबळ माजली आहे. या वृत्तात, राहुल गांधींचे नाव अफगाणिस्तानचा माजी राजा मोहम्मद झहीर शाह यांच्या नातीशी जोडले आहे. परंतु या वृत्तात संबंधित राजकुमारीचे नाव देण्यात आलेले नाही.
यावृत्ताने आता उलटसूलट चर्चेला ऊत आला आहे. 'दी संडे गार्जियन'चे वृत्त जर खरे असेल तर राहुल गांधींना वॅरोनिकाचा विसर पडला आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्पॅनिश येथील वॅरोनिका आणि राहुल यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे वृत्त 1999 मध्ये विश्वचषकादरम्यान उघड झाले होते.
दोघांची छायाचित्रेही या काळात समोर आली होती.
सुप्रसिद्ध पत्रकार एम जे अकबर यांच्या 'दी संडे गार्जियन'ने असा दावाही केला आहे की, अफगाण राजकुमारीने धर्म बदलून तिने ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी एका रविवारी आयोज‍ित केलेल्या प्रार्थना सभा होम चॅपलमध्ये दोघांनी सहभागही घेतला होता, असेही 'दी संडे गार्जियन' म्हटले आहे.
43 वर्षींय राहूल गांधी आणि अफगाण राजकुमारी दिल्लीतील अमन हॉटेल मध्ये नेहमी भेटतात. राहुल राजकुमारीसोबत फिटनेस सेंटरमध्ये तासंतास गप्पा मारतात, असेही या वृत्तात म्हटले आहे.
'दी संडे गार्जियन'मधील वृत्ताला विदेशी प्रसारमाध्यमे आणि वेबसाईट्‍सनेही चांगली प्रसिद्धी दिली आहे. त्यात 'जकार्ता पोस्ट' सारख्या वेबसाईट्सचा समावेश आहे. सोशल नेटवर्कींग साईट्‍सवरही राहुल आणि राजकुमारीच्या कथित प्रेमसंबंधावरून खळबळ माजली आहे. 'टि्‍वटर'वर तर राहुल आणि राजकुमारीच्या प्रेमसंबंधावर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
(छायाचित्रे: 'ट्‍विटर'वर एका युजरद्वारा अपलोड केलेले 'दी ‍संडे गार्जियन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची इमेज)

अफगाणिस्‍तानची राजकन्‍या राहुल गांधींच्‍या आयुष्‍यातील लेडी लव्‍ह?
देशाचे 'मोस्ट इलिजिबल बॅचलर' राहुल गांधी यांची दुर्मिळ छायाचित्रे
खासदार सचिनला राहुल गांधींच्या शेजारचा व्हीव्हीवायपी बंगला!